General news

पंढरपूर येथे पार्किंगबाबत सामाजिक संघटनांनी आणि पक्षांनी दिला आंदोलनाचा इशारा

सामाजिक संघटनांनी आणि पक्षांनी दिला आंदोलनाचा इशारा

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामुळे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे वर्षभर भाविक भक्त येत असतात. आता पूर्वीसारखे फक्त वारीमध्ये भाविक येतात असे नसून वर्षभर पंढरपूरला दर्शनासाठी येत राहतात. सणवार आणि सुट्ट्यांच्या काळात पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची संख्या मोठी असते.

भाविक पंढरपूरला दर्शनासाठी येत असताना जेजुरी ,शिंगणापूर , पंढरपूर ,सोलापूर , तुळजापूर ,गाणगापूर अशा तिर्थक्षेत्रांनाही भेटी देत असतात.श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येताना घरातील, शेजारी, गावकरी मंडळी एकत्र येत एखादे वाहन करून येत असतात.

परंतु पंढरपूर येथे आल्यानंतर त्यांना अनेक अडचणींवर मात करावी लागत आहे.वाहन पार्किंग करण्यासाठी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने अनेक वाहन पार्किंग तळ निर्माण केले आहेत.पार्किंग फी अडवणूक करून घेतली जात आहे अशा तक्रारीनंतर फ्रि पार्किंग तळ करण्यात आले.काही ठिकाणी तसे फलक लावण्यात आले.मात्र काही ठिकाणी हे फलक गायब झाले आहेत.वाहने रस्त्यांवर लावायला सांगत या भाविकांकडून पैसे घेऊन काही महाभाग निघून जातात. भाविकांशी अरेरावीची भाषा वापरली जाते. थोड्या रक्कमेसाठी कुठे कटकट करायची असे म्हणत भाविक शांतपणे निघून जातात.पंढरपूर येथे येणाऱ्या या भाविकांना अत्यंत कटु अनुभवामुळे भाविक पंढरपुरात येण्यासाठी नाराजी व्यक्त करत आहेत.

 

काहीजणांच्या अशा वर्तनामुळे संपूर्ण पंढरपूरकर बदनाम होत आहेत. पार्किंगच्या ठिकाणी अस्वच्छता असते.कुंभारघाटाजवळ असलेल्या सहकार पार्किंग तळ घाणीने आणि दुर्गंधीने वेढलेला आहे.वाहन आत पार्किंगमध्ये नेतांना भलामोठा खड्डा पडला आहे.त्यामुळे वाहन आत नेतांना वाहनाला धोका निर्माण होतो आहे.तरी तो भाग तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी वाहनधारक भाविकांकडून करण्यात येत आहे.

भाविकांना मिळणाऱ्या अपुर्या सुविधांबाबत सामाजिक संघटनांनी आणि पक्षांनी आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *