राजकीय न्यूज

नोकरभरती पेपरफुटी प्रकरणी न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष चौकशी समिती स्थापना करा- आम आदमी पार्टी

नोकरभरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणी न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष चौकशी समितीची स्थापना करा:- आम आदमी पार्टी

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई,व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : आज राज्यात जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे जवळपास रोजचे झाले आहे.पेपर फुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही, त्यामुळे आम आदमी पार्टीने राज्यभर आक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले आहे.

हमखास सरकारी नोकरी मिळत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या तरुणांनी आज कोणाकडे न्यायाची अपेक्षा करायची असा प्रश्न आम्ही सरकारला विचारत आहोत. जर हे पेपर फुटीचे प्रकरण यापुढेही चालू राहिले तर आम आदमी पार्टी उग्र आंदोलन करेल असा इशारा आम्ही सरकारला देतो आहे असे आपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी सांगितले.

देवेंद्र फडवणीस हे गृहमंत्री असताना सुद्धा या महत्वाच्या पेपर फुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई अजून तरी फडवणीस यांनी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे असा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

आम आदमी पार्टीच्या राज्यस्तरीय आक्रोश मोर्चात राज्यातील आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्पर्धा परीक्षा देत असलेले विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम आदमी पार्टीने सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत

१. सदोष तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून, तलाठी तसेच सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेतल्या जाव्यात.

२. नोकभरती परीक्षेत झालेल्या पेपरफुटीची चौकशी करण्यासाठी ताबडतोब न्यायालयाच्या निगराणीखाली विशेष चौकशी समितीची स्थापना करून पुढील ४५ दिवसांत समितीला अहवाल सादर करावयास सांगावा.

३. पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत. पेपरफुटीतील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा व रु.१० कोटी इतका कठोर दंड आकारण्याचा कायदा बनवावा.

५. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण कायमचे रद्द करण्यात यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *