नदी पात्रातुन अवैदय रित्या वाळु उत्खनन करून चोरुन वाहुन नेत असतानाचा गुन्हा दाखल

नदी पात्रातुन अवैदयरित्या वाळु उत्खनन करून चोरुन वाहुन नेत असतानाचा गुन्हा दाखल Filed a case of illegally excavating sand from a river basin and stealing it

पंढरपूर /प्रतिनिधी – दि.16/07/2021 रोजी सायंकाळी 07/35 वा चे दरम्यान मौजे आंबे येथील आंबे ते सरकोली रोडवरील पुजारी वस्ती ता.पंढरपुर येथे भिमा नदी पात्रातुन अवैदयरित्या वाळु उत्खनन करून चोरुन वाहुन नेत असताना टाटा एस कंपनीचा विटकरी रंगाचे हेड व मागील हौदा निळ्या रंगाचा टिपर क्र. GA-02-T-9203 असा असलेला जुना वापरता व मागील हौदयात 16,000/- रु. किंमतीची 2 ब्रास वाळु असे एकुण किं.अं. 6,16,000 / – पकडण्यात आला अशी फिर्याद पो.हे.कॉ.इसाक म.यासीन सय्यद , पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी दिली.

   याबाबत हकिकत अशी, दि.16/07/2021 रोजी 19/35 वा. चे सुमारास मौजे आंबे येथील पुजारी वस्तीजवळ रोडवर चालक विक्रम हणमंत चौंडे रा.आंबे ता. पंढरपूर. हा त्याचे कब्जातील टाटा एस कंपनीचा विटकरी रंगाचे हेड व मागील हौदा निळ्या रंगाचा टिपर क्र. GA-02-T-9203 असा असलेला जुना वापरता टिपर वाहनामध्ये भिमा नदी पात्रातुन अवैदयरित्या वाळु उत्खनन करून चोरुन वाहुन नेत असताना पोलीसांची चाहुल लागताच त्याचे कब्जातील वाहन जागेवर सोडुन पळुन गेला आहे म्हणुन वगैरे मजकूर ची फिर्याद आलेने ती भाग 5 गु.र.नं 556/21 भा.दं.वि.कलम 379 गौण खनिज कायद कलम 4(1),4(क)(1),21. प्रमाणे  रजि दाखल करून पुढील तपास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे आदेशाने पो.हे.काँ.घंटे यांना देण्यात आला आहे .

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: