General news

श्री 1008 भगवान मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर मोडनिंब येथे वार्षिक यात्रा महोत्सव

श्री 1008 भगवान मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर मोडनिंब येथे वर्षपूर्ती निमित्त वार्षिक यात्रा महोत्सव

मोडनिंब ता माढा / ज्ञानप्रवाह न्यूज – मोडनिंब येथील चतुर्मुख महाराष्ट्रातील प्रथम अतिशय क्षेत्र श्री 1008 भगवान मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर मोडनिंब यास 1 फेब्रुवारी रोजी वर्षपूर्ती निमित्त वार्षिक यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात श्रावकांच्या उपस्थितीत पार पडली.

या निमित्ताने भगवंतांचा 108 रिद्धीमंत्रांनी महामस्तकाभिषेक , शांती मंत्र ,श्री भक्ताम्बर अनुष्ठान विधान कार्यक्रम झाले.हे सर्व पंडित सुधीर शास्त्री व श्रावकांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष विशाल मेहता,अरविंद गुरसाळकर , सुरेश गांधी सुनील पुरवत,निलेश गुरसाळकर ,वैभव मेहता,रत्नदीप मेहता,शैलेश दोशी,श्रेयस दोशी,वर्धमान भालेराव,महावीर पूर्वत,शैलेश दोशी ,राहुल बाबळे ,अभिनंदन खडके, सुदर्शन मेहता, जवाहर गुरसाळकर आदी सह श्रावक ,श्राविका ,महिला मंडळ उपस्थित होते. या निमित्ताने आलेल्या श्रावकांना शिरा व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *