कुर्डुवाडीचा विस्तारित भाग विकासापासून वंचित त्यामुळे नागरिकांंत नाराजी

कुर्डुवाडीचा विस्तारित भाग विकासापासून वंचित त्यामुळे नागरिकांंत नाराजी

कुर्डुवाडी/ राहुल धोका – कुर्डुवाडी शहरालगत अनेक वसाहती निर्माण झाल्या परंतु या वसाहती नगरपरिषदेत सहभागी करण्यासाठी प्रयत्नच झाले नाहीत. त्यामुळे हा भाग वर्षानुवर्ष विकासापासून वंचित राहिला.त्यामुळे हा भाग कुर्डुवाडीला जोडण्याचा केलेला प्रयत्न हा दिखावा आहे असे मत या वसाहतीतील स्थानिक नागरिकांचे बनले आहे .

 या विस्तारीत भागातील नागरिकांची सदर भाग कुर्डुवाडीमध्ये सहभागी करावा अशीच मागणी होती परंतु राजकिय इच्छा शक्ती नसल्याने  महात्मा फुले नगर ,सम्राट अशोकनगर,माऊली नगर ,छत्रपती शाहु नगर , नमिता नगर, तुकाराम नगर, राऊत वस्ती,भांबुरे वस्ती यांची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मीतीची मागणी होत आहे. 

शहरातील नोकरवर्गांच्या या सर्व वसाहती असून त्या ठिकाणी मोठी आर्थिक ताकद आहे. येथून भोसरे ग्रामपंचायतीस मोठा महसूल मिळतो. त्या मुळे भोसरे ग्रामपंचायतीचे धोरण हा भाग जोडुन ठेवण्याचेच असले तरी अधिक महसूल मिळुन ही या भागाचा विकास होत नाहीये. कुर्डुवाडी शहर पाणी पुरवठा योजना,के.एन.भिसे काॅलेज,अनेक विद्यालय , एम.एस.सी.बी चे कार्यालय याच भागात आहेत .

कुर्डुवाडी नगरपरिषदेने नुकताच हद्दवाढ प्रस्ताव मंजुर केला आहे .परंतु कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या झालेल्या ठरावाचा पाठपुरवा होईल का हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे .त्यामुळे निदान स्वतंत्र ग्रामपंचायत तरी व्हावी अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.

रेल्वे रुळाचा पुर्व उत्तर भागातून भोसरे ग्रामपंचायतीस मोठा महसुल जातो. परंतु त्या प्रमाणात विकास झाला नाही. त्यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मीती करावी अशी मागणी आहे कुर्डुवाडी नगरपरिषदेत सहभागी होण्याची आमची तयारी आहे ,परंतु कुर्डुवाडी नगरपरिषद या विषयीचा केवळ दिखावा करत आहे त्यामुळे सदर भागाचा समावेश ग्रामपंचायत भोसरे २ अथवा राजश्री शाहु नगर म्हणुन स्वतंत्र नगरपंचायत तयार करावी. -डाॅ.प्रा.आशिष रजपुत
सम्राट अशोक नगर ,भोसरे

दत्तनगर सारख्या भागात शुध्द पाण्यासह अनेक समस्या आहेत .येथे सधन नोकर वर्ग राहतो.आम्ही कर भरण्यास तयार आहोत. हा भाग कुर्डुवाडी मध्ये सहभागी करुन येथे सोयी निर्माण कराव्यात
-अजित कन्हेरे सर ,दत्तनगर ,भोसरे

 आम्ही २२ वर्षापुर्वीच स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली होती परंतु आता कुर्डुवाडी नगर परिषदेने लवकरात लवकर हा भाग सामिल करुन घ्यावा. जगदाळे नगर भागात अनेक अधिकारी प्रवर्गातील नागरिक राहतात तरीही आम्हास अत्यावश्यक सोयी मिळत नाहीत. -एस. एन . कुंभार ,माजी रेल्वे अधिकारी , जगदाळे नगर ,भोसरे

आम्हास विकास हवा आहे, यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायतीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिलेले आहे. कुर्डुवाडी नगरपरिषदेत आमची सहभागी होण्याची तयारी आहे पण नेते मंडळींनी हे मृगजळ बनविले आहे – अमोल हावळे ,महात्मा फुले नगर ,भोसरे

परंतु या प्रश्नावर कोण आवाज उठवणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: