राजकीय news

राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं हिरेजडित रत्न- गजानन राणे

राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला मिळालेलं हिरेजडित रत्न- गजानन राणे

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे यांचे मनोगत

जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई,व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज : राज ठाकरे म्हणजे अस्सल मराठी व्यक्तिमत्व, राज ठाकरे म्हणजे धर्मांध नव्हे तर धर्माभिमानी हिंदू, राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, राज ठाकरे म्हणजे सत्य आणि असत्य ह्यातला फरक अधोरेखित करणारा दुवा, राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्र प्रेमाचं निस्सीम उदाहरण, राज ठाकरे म्हणजे ह्या इथल्या महाराष्ट्राच्या मातीला आणि आई समान असलेल्या मराठी भाषेलाही अभिमान वाटावा असा जिगरबाज सुपूत्र,आपली अस्मिता जपणारा अन् मातृभाषेवर जीवापाड प्रेम करणारा नेता. दुर्दैवाने याच मातीत जन्माला आलेल्या काही नतद्रष्ट लोकांना राज ठाकरे कळले नाहीत किंबहुना मुद्दामहून कळवून घ्यायचे नाहीत.कारण राज ठाकरेंचं महाराष्ट्रात वजन वाढलं तर इतर राजकारण्यांची झोळी कायमच रिकामी राहील यामुळे वरकरणी राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत असं सांगून त्यांच्याविषयी आदरभाव,ममत्व दाखवणारे सर्वपक्षीय नेते आतून मात्र राज ठाकरेंशी तितकेच प्रामाणिक नाहीत हेही तितकेच खरे आहे. राज ठाकरेंसारखा सह्याद्री सम कणखर नेता इतर दुसऱ्या कुठच्या राज्यात जन्माला आला असता तर त्या राज्याने राज ठाकरेंना डोक्यावर घेऊन त्यांच्या हातात सत्ता दिली असती परंतु दुर्दैवाने महाराष्ट्राची जनता राज ठाकरेंना अजूनही ओळखू शकली नाही.यात राज ठाकरेंचं नव्हे तर महाराष्ट्राचं भलं मोठं नुकसान आहे. महाराष्ट्राचा सर्वच बाजूने होणारा ऱ्हास जर थांबवून महाराष्ट्राला त्याचं गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर महाराष्ट्रासमोर केवळ एकच पर्याय आहे तो म्हणजे राज ठाकरे हे जेव्हा महाराष्ट्राची जनता स्वतःचं समजून घेईल त्यादिवशी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सुवर्ण दिवस असेल पण इथे समजून घ्यायचं कोणाला ? अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असो इंदू मिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक असो टोलनाके असो वा कडवट मराठी भूमिका असो सगळ्यांनी राज ठाकरेंचा विरोध केला.आज ते सगळे मुद्दे निक्षून पहा राज ठाकरे जे तळमळीने बोलत होते ते प्रश्न आजही अडकून पडले आहेत आणि आपण भ्रामक कल्पनांच्या मागे धावतो आहे.

मराठी भाषा, भूमिपुत्रांना रोजगार, गड किल्ले संवर्धन, लोकपयोगी स्मारकं, टोलनाके, चांगले रस्ते, उत्तम आरोग्य व्यवस्था, शिक्षण, पर्यटन अर्थव्यवस्था, तुमच्या मुलांसाठी मोकळी मैदाने, तुमच्यासाठी मोकळा श्वास. जे जे राज ठाकरे बोलत होते, बोलत आहेत, बोलत राहतील हेच तर तुमचे मूळ प्रश्न आहेत.निवडणुका विकास कामांवर व्हाव्यात. कामे केली तरच मतं मागायला येणार अन्यथा मतं मागायला येणार नाही हे त्यांनी ठासून सांगितलं अन् मिळालेल्या छोट्या शहरातल्या ५ वर्षे सत्ता काळात मी काय करू शकतो ? अन् ५ वर्षाच्या केलेल्या कामाचा लेखाजोखा व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला. त्यांनी लक्षात ठेवले ते फक्त लाव रे तो व्हिडिओ यात राज ठाकरेंचा दोष तो काय ? राज ठाकरेंनी केलेल्या कामाच्या प्रेझेंटेशनचे व्हिडिओ लक्षात ठेवले पाहिजेत, आठवले पाहिजेत. आजची ही सगळी दुर्दशा पाहता महाराष्ट्राला राजकीय चिखलाच्या दलदलीतून बाहेर काढायचं असेल तर फक्त एकदा फक्त एकदा राज ठाकरेंवर विश्वास ठेवून बघा कारण आता राज ठाकरेंशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही. महाराष्ट्राला त्याचं गतवैभव पुन्हा मिळवून द्यायचं असेल तर केवळ राज ठाकरेच ही गोष्ट अमलात आणू शकतात. मराठी माणसाने राज ठाकरेंना महाराष्ट्राचं सारथ्य करण्याची संधी द्यायला हवी. तेव्हा त्यांच्या एका हातात महाराष्ट्रवाद असेल आणि दुसऱ्या हातात महाराष्ट्राचा विकास आराखडा असेल अन् इथूनच नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीची नवी कथा राज ठाकरेंच्या हातून लिहिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *