शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार योग्य बदल करून शिक्षण देणे गरजेचे -डॉ.प्रशांत पवार

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेनुसार योग्य बदल करून शिक्षण देणे गरजेचे -डॉ.प्रशांत पवार Teachers need to make education by making appropriate changes according to comprehension ability of students – Dr.Prashant Pawar

स्वेरीच्या डॉ. प्रशांत पवार यांचे शैक्षणिक पद्धती व साधनांचा वापर यावर मार्गदर्शन संपन्न
  पंढरपूर- शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखणे आवश्यक असून त्यांना शिकवलेले समजण्यासाठी नेमकं कशाप्रकारे शिकवले पाहिजे, त्यांना काय पाहिजे आहे ? या बाबींचा अंदाज घेऊन त्यांना शिक्षण देणे क्रमप्राप्त ठरेल. शिक्षकांनी मी जे करतो, ते का करतो ? हा प्रश्न स्वतःला विचारून त्यानुसार शिक्षण दिल्यास  विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित बदल दिसून येतो. विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण करून त्यानुसार शिक्षण दिले गेले पाहिजे. यासाठी वेळ लागेल पण पुढे विद्यार्थी लक्ष देवू लागतो. म्हणून शिक्षकांच्या दृष्टीने ‘व्हाय, हाऊ आणि व्हाट’ हे तीन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ‘डिसिजन, डिटरमिनेशन आणि डेडिकेशन’ हे देखील शिक्षणातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात योग्य दिशा मिळते.’ असे प्रतिपादन स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार यांनी केले. 

     सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजीवकुमार राठोड, पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, शिक्षण विस्तार अधिकारी बिभीषण रणदिवे व मारुती लिगाडे यांच्या सौजन्याने व स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी झूम अँपद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'विद्यार्थी विकासासाठी विविध शैक्षणिक पद्धती व साधनांचा वापर' या विषयावर यावेळी  डॉ.पवार शिक्षकांना मार्गदर्शन करत होते. 

   पुढे बोलताना डॉ.प्रशांत पवार म्हणाले की, ‘विद्यार्थ्याना शिक्षण देताना त्यांना  समजेल अशा पद्धतीने शिकवावे लागते. आता कोविड-१९ मुळे शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल झाला असून याचा विद्यार्थ्यांवर व शिक्षणावरही प्रचंड परिणाम झाला आहे. डॉ.पवार यांनी शिक्षकांना गुगल फॉर्म कसा तयार करावा ? व तो कसा भरावा? याचेही प्रशिक्षण दिले. 

यावेळी मंगेश परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मार्गदर्शन सत्रानंतर जिल्हा परिषद शाळेच्या अनेक शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर प्रश्न विचारले असता डॉ. पवार यांनी तंत्रज्ञानाविषयी माहिती सांगून ऑनलाइन शिक्षण पद्धतीविषयी मार्गदर्शन दिले. उपस्थित शिक्षकांना ऑनलाईन सर्टिफिकेट देण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील २५० हून अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला. शिक्षकांतर्फे प्रशांत वाघमारे यांनी आभार  मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: