जेष्ठ धन्वन्तरी डॉ. विलास मेहता यांना जीवन गौरव पुरस्कार

हा खेळ संचिताचा हे पुस्तक प्रकाशित,आयएमए कडून कोरोना योध्दयांचा गौरव

कुर्डूवाडी/राहुल धोका – कुर्डूवाडी शहरातील जेष्ठ धन्वंतरी डॉ विलास मेहता यांचा इंडियन मेडीकल असोसिएशनकडून जीवन गौरव पुरस्कार देवून डॉ.बी.वाय.यादव अध्यक्ष जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी,अध्यक्ष शिवाजी शिक्षण मंडळ बार्शी यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.राजेंद्र दास होते.प्रसंगी डॉ मेहता यांचे हा खेळ संचिताचा हे आत्मचरित्र प्रकशित करण्यात आले. यावेळी  मंचावर शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे , नगराध्यक्ष समीर मुलाणी,डॉ.दिनेश कदम,डॉ. शिवाजी थोरात डॉ.सुनंदा रणदिवे,डॉ.आशिष शहा,डॉ.सचिन माढेकर ,डॉ रोहित दास, डॉ.संतोष कुलकर्णी ,सुहास शहा आदी मान्यवर होते . 

  यावेळी कुर्डूवाडी शहरात कोरोनासाठी काम करणारे डॉ शिवाजी थोरात ,तालुका आरोग्य अधिकारी,डॉ.सुनंदा रणदिवे ग्रामीण रुग्णालय अधिक्षक ,डॉ.चंद्रशेखर साखरे, डॉ.लकी दोशी, डॉ.रोहित बोबडे ,डॉ.प्रसन्न शहा ,डॉ.विनायक रुपदास यांचाही सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. 

 यावेळी डॉ.रवींद्र बोबडे,डॉ परम बिनायकीय , डॉ शुभम बोबडे,डॉ संतोष दोशी,डॉ.बाहुबली दोशी,डॉ.संतोष सुर्वे,चेतन शहा,प्रकाश शहा , सुर्यकांत जाधव ,महेंद्र मेहता ,श्रीपाल धोका आदी आय.एम.ए चे सदस्य उपस्थित होते. 

जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे पहिली शस्त्रक्रिया ही डॉ विलास मेहतांसह डॉ.बी.वाय. यादव यांनी केली होती. डॉ.विलास मेहता यांनी अविरत ५० वर्ष गुणवान सेवा दिली.माजी वैद्यकीय अधिकारी म्हणून ही त्यांनी सेवा केलेली आहे .कुर्डुवाडीतील राजकीय चाणक्य म्हणून त्यांची ओळख आहे .त्यांच्या तळमळीमुळेच अनेक कोरोना रुग्णालये कुर्डुवाडीत उभा राहिली. डॉ.मेहता यांचे जीवनपटावरील हा खेळ संचिताचा हे पुस्तक भावी पिढीसाठी आदर्शवत ठरणार आहे

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: