nationalNews

बुद्धभूमी महाविहारासाठी जमीन आणि 5 कोटी चा निधी मिळवून देणार – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धभूमी महाविहारासाठी जमीन आणि 5 कोटी चा निधी मिळवून देणार – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

भोपाळ /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.2 – बुद्धभूमी महाविहार मॉनेस्ट्री आणि गोल्डन बुद्ध प्रतिमा परिसराची जमीन बुद्धभूमी धम्मदूत संघाच्या नावावर करून देण्यासोबत या विहार परिसरात विपश्यना केंद्र ,भिक्खू निवास आदी सुविधांसह बुद्धभूमी चा विकास करण्यासाठी मध्य प्रदेश राज्य सरकार कडून रु.5 कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री मोहन यादव यांची आपण भेट घेऊन पत्र देऊ असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.ते भोपाळ येथे आयोजित 8 व्या आंतररष्ट्रीय बौद्ध मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

यावेळी बुद्धिस्ट मेळाव्याचे आयोजक भदंत शाक्यपुत्र सागर थेरो,प्रमुख अतिथी थायलँड चे पुज्य भदंत फ्रा अचान विच्छिअन, भदंत गजानंद थेरो श्रीलंका; भन्ते थिक थुई थोन्ग भूतान,भन्ते आनंद प्रिय थेरो बांगलादेश, लामा सोनम तोबगाय भूतान,भन्ते हर्षबोधी बुद्धगया,भन्ते रुपेश दिल्ली,भन्ते अभय नायक नागपूर, भन्ते विनशील कुशीनगर, भिक्षूणी श्रद्धा पुष्प ग्वालीयर , भन्ते राहुल पुत्र यांच्यासह जगभरातील बौद्ध भन्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार भगवानदास सबनानी; किसन सूर्यवंशी,रिपाइंचे मोहंमद एहसान, दिलीप कडबे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

बँकॉक मध्ये जशी पर्वतावर कोरलेली बुद्धप्रतिमा आहे तशीच भोपाळमध्ये सुद्धा उंच पर्वतावर कोरीवकाम करून बुद्ध प्रतिमा कोरली पाहिजे अशी सूचना ना.रामदास आठवले यांनी केली. जगाला युद्ध नाही तर बुद्ध विचारांची गरज आहे.बौद्ध धम्म शांती अहिंसेच्या तत्वांचे उगमस्थान आहे असे ना.रामदास आठवले म्हणाले.यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध आंबेडकरी जनता उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *