सुरक्षिततेच्या दृष्टीने दुष्काळी तालुक्यातील सर्वच तलावांचे तांत्रीक परिक्षण करा – सादिक खाटीक

सुरक्षिततेच्या दृष्टीने दुष्काळी तालुक्यातील सर्वच तलावांचे तांत्रीक परिक्षण करा – सादिक खाटीक Perform technical inspection of all lakes in the drought stricken taluka for safety – Sadiq Khatik
  आटपाडी,दि .१७/०७/२०२१ /प्रतिनिधी -

अतिवृष्टी – ढगफुटी सारख्या आकस्मित संकटातून दुष्काळी तालुक्यातील सर्वच प्रकारच्या तलावांना धोका निर्माण होवू शकतो, त्यातून वित्तहानी – जीवीत हानीची शक्यता नाकारता येत नसल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वच तलावांचे तांत्रीक परिक्षण ( टेक्नीकल ऑडीट ) केले जावे अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पाठविलेल्या ईमेल द्वारे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केली आहे .

  दुष्काळी तालुक्यातील बहुतांश लघुपाटबंधारे तलाव हे सरासरी ५० वर्षापेक्षा जास्त जुने आहेत . अवर्षण प्रवण भाग, तेथील सरासरी ४०० ते ५०० मि.मी पर्जन्यमान व ५० ते ७५ टक्के पावसाची विश्वासार्हता विचारात घेऊन या तलावांची निर्मिती करण्यात आली आहे . तथापि सध्या पावसाचे तंत्रच बदलले गेले आहे. एखादे वेळी ढगफुटी अथवा अतिवृष्टी सारखा लहरी पाऊस पडून जातो आणि दोन तीन दिवसातच हे तलाव भरून वाहतात . टेंभू उपसा सिंचनाच्या आवर्तनावेळी अशा तलावात अंशतः पाणी भरलेले असतेच . अशा वेळी अचानक अतिवृष्टी किंवा ढगफुटी झाल्यास या तलावांमध्ये पाणी येवून तलावांच्या स्थैर्यास बाधा येण्याची शक्यता असते. त्यामुळे तलाव्यांच्या सांडव्यांची दुरुस्ती होणे आवश्यक बनते . दुष्काळी तालुक्यातील तलाव, टेंभू उपसा सिंचन सारख्या योजनांचाच एक अविभाज्य भाग झालेले आहेत . 

 आटपाडी तालुक्यातील आटपाडी,कचरेवस्ती, जांभूळणी,दिघंची,निंबवडे,अर्जुनवाडी,माळीवस्ती, बनपूरी,शेटफळे,गोरडवाडी,विभूतवाडी, घाणंद महाडीकवाडी यासह मोठे पाझर तलाव, साठवण तलावांचा विचार करता, महाराष्ट्र लाक्षक्षेत्र सुधार प्रकल्पाच्या निधी मधून २००५ ते २००९ मध्ये आटपाडी आणि दिघंची तलावांची हाती घेतलेली कामे अपुर्‍या निधीमुळे फक्त कालव्यावरील वितरण व्यवस्थेची अंशत कामे केली गेली परंतु तलावाच्या दुरुस्तीची कामेच झाली नाहीत . तसाच प्रकार २०१० ते २०१६ मध्ये दुरुस्ती, नुतनीकरण व पुनर्स्थापना या अंतर्गत घाणंद तलावाचे हाती घेतलेले काम पुरेशा निधीअभावी कालव्यावरील वितरण व्यवस्थेच्या अंशत कामा खेरीज धरणाच्या दुरुस्तीचे काम होवू शकले नाही .एकंदर तालुक्यातील विविध तलावांची, कालवे, वितरीका सांडवे आणि मुख्य तलाव यांची दुरुस्ती नुतणीकरण व पुनर्स्थापना विषयक कामे मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेणे गरजेचे आहे . धरण सुरक्षा संघटना नाशिक यांच्याकडून सर्व तलावांची पाहणी करून आवश्यक त्या तलावांची ,सांडवे, मातीकामे, मुख्य विमोचक यांची कामे तसेच तलावावरील झाडे झुडूपे,आतील गाळ,तलावाच्या दगडी पिचिंगची कामे होणे महत्वाचे आहे . 

 तलावातील गाळ मोफत नेण्यासाठी परवानगी तसेच वाहतुकीच्या इंधनासाठी अनुदान दिल्यास तलावातील गाळ काढला जावून ही मानव निर्मित भांडी स्वच्छ होतील आणि निघालेल्या गाळाने शेकडो एकर शेती सुपिक बनू शकेल .

  टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रा बाहेरील,आटपाडी तालुक्यातील सर्वच गावांचा टेंभुत समावेश करून समन्यायी पाणी वाटपाच्या बंदिस्त पाईपलाईनच्या कामांना युद्धपातळीवरून गती दिली पाहीजे . बंदिस्त पाईप लाईन वितरण व्यवस्थेची कामे प्रलंबीत असल्याने टेंभूचे पाणी,ओढे,नाले,नदीत सोडून सध्या सिंचन व्यवस्थापन होते आहे . 

   राजेवाडी (म्हसवड) तलावाच्या आटपाडी तालुक्यात ८ किलोमीटर आत येणाऱ्या उजव्या कालव्याचे काम सुमारे ३० वर्षापासून रखडले आहे .या कामाला पूर्णत्व देण्याबरोबरच तालुक्या तील सर्व तलाव जोडण्याचे उद्देशाने राजेवाडी ते बुद्धीहाळ दरम्यान ही तलाव जोड योजना अस्तित्वात आणावी याकडेही मंत्री जयंत पाटील यांचे सादिक खाटीक यांनी लक्ष वेधले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: