Newsपंढरपूर नगरपरिषद

नगरपरिषदेमधील कर्मचारी वसाहतीमध्ये ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी बसवणार – मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव

पंढरपूर नगरपरिषदेमधील कर्मचारी वसाहतीमध्ये ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी बसवणार – मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.03/02/2024- महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने जिल्ह्यातील सर्व नगर परिषद नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये ओपन जिम व लहानांसाठी खेळणी बसवावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

याची दखल घेत जिल्ह्याचे कार्यक्षम व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकार्यांची विशेष बैठक आयोजित केली होती .

या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकार्यांनी नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या वसाहतींना भेटी देऊन कर्मचाऱ्यांच्या असलेल्या घरांची किरकोळ दुरुस्ती,सेवानिवृत्त कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ओपन जिम,लहान मुलांसाठी खेळणी बसवण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे व समन्वय समितीचे राज्याचे सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरु दोडिया यांच्यासमवेत नगरपरिषदेच्या गुजराती कॉलनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर व नगरपरिषद कर्मचारी ची घनश्याम हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी समक्ष भेटी दिल्या यावेळी ज्या ठिकाणी ओपन जिम व लहान मुलांसाठी खेळणी बसवायचे आहेत त्या ठिकाणांची पाहणी केली तसेच गुजराती समाजाच्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमधील घरांची पाहणी करून ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या घरावरील पत्रे खराब झाले आहेत अथवा किरकोळ दुरुस्ती करायची आहे त्याची पाहणी करून त्या ठिकाणी दुरुस्ती करावी म्हणून अभियंता प्रवीण बैले यांना सूचना दिल्या. सदरची कामे कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी झाली पाहिजेत असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले.गुजराती कॉलनी येथील समाज मंदिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी सुरू करण्याबाबत चर्चा झाली. त्याठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या प्रतीचे शौचालयही बांधण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

यावेळी समन्वय समितीचे राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड.सुनिल वाळूजकर व अखिल भारतीय सफाई कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष गुरु दोडीया यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतल्यामुळेच या कामाला गती आली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांचे विशेष आभार व्यक्त केले.

यावेळी नानासाहेब वाघमारे,महेश गोयल, सतीश सोलंकी,अनिल गोयल,दत्तात्रय चंदनशिवे, संतोष सर्वगोड, धनंजय वाघमारे, जयंत पवार,दिनेश साठे,संजय वायदंडे,महावीर भाऊ कांबळे,संदेश कांबळे, दशरथ यादव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *