मा.आ.अरुण गवळी यांच्या वाढदिवसा निमित्त पंढरपुरात पालवी येथे कार्यक्रम

मा.आ.अरुण गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात पालवी येथे कार्यक्रम संपन्न A function was held at Palvi in ​​Pandharpur on the occasion of Arun Gawli’s birthday
पंढरपूर / प्रतिनिधी :- पंढरपूर येथील प्रभा हिरा प्रतिष्ठान संचलित एड्स बाधित विशेष बालकांचे संगोपन केंद्र पालवी येथे अखिल भारतीय सेनेचे प्रमुख अरुण गवळी उर्फ डॅडी Arun Gavali  यांच्या वाढदिवसा निमित्त दि.१६ रोजी बालकांना फळे आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम अखिल भारतीय सेनेचे सरचिटणीस सौ.आशाताई अरुण गवळी उर्फ मम्मीजी यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपुरातील अखिल भारतीय सेनेचे Akhil bhartiy Sena समर्थक सागर जाधव आणि पंढरी उदय साप्ताहिकाचे संपादक सुदर्शन रायचंद खंदारे यांच्यातर्फे करण्यात आले होते.

अखिल भारतीय सेनेचे प्रमुख अरुण गवळी यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या वाढदिवसा निमित्त मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात अखिल भारतीय सेनेच्या समर्थकांतर्फे अन हितचिंतकांतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमातून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला जातो.

  पंढरपुरातील पालवी या संस्थेत सुमारे १५० एड्सग्रस्त बालकांचा संगोपन प्रकल्प संचालिका तथा संस्थाप्रमुख श्रीमती मंगल ताई शहा यांच्या मार्फत चालविला जातो. अखिल भारतीय सेनेच्या सरचिटणीस सौ.आशाताई अरुण गवळी या विठ्ठलाच्या निस्सिम भक्त आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला त्या कायम येत असतात.

   कोरोनाच्या काळामुळे विठ्ठलाच्या वारीला आणि वारकऱ्यांना वारीला येण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात १७ ते २५ जुलै पर्यंत संचारबंदी शासना मार्फत घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे असंख्य विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या दर्शनाला मुकले आहेत. परंतु अखिल भारतीय सेनेचे प्रमुख अरुण गवळी यांच्या पत्नी सौ.आशाताई अरुण गवळी यांची विठ्ठल भक्ती जगजाहीर आहे. त्यामुळे संचारबंदी लागू होण्यापूर्वी शासन नियमांचे पालन करून सौ.आशाताई गवळी यांनी पंढरपुरात येऊन विठ्ठलाची वारी वेगळ्याच प्रकारे साजरी करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार पंढरपुरातील अखिल भारतीय सेनेच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पालवी येथील अनाथ बालकांसाठी फळे आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम पालवी palwi येथे आयोजित केला होता .

  या कार्यक्रमाच्या वेळी सौ.आशाताईंनी कायम या संस्थेच्या पाठीशी राहण्याचे अभिवचन देऊन आपली सामाजिक जबाबदारी सांभाळण्यास आपण सक्षम आहोत हे दाखवून दिले. 

आपल्या मनोगताच्या वेळीच सौ.आशाताई गवळी यांनी दिनांक १७ रोजी याच पालवी संस्थेमधील बालकांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करून त्यासाठी लागणारा निधी याच कार्यक्रमात संस्था संचालीका मंगलताई शहा यांच्या स्वाधीन केला.

या खाऊ वाटपानंतर पालवी संस्थेच्या व्यवस्थापिका शितलताई यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: