Newssports

आरोग्याची वारी,आबालवृद्धांच्या उत्साहात न्हाऊन निघाली पंढरी – चेअरमन अभिजीत पाटील

आरोग्याची वारी,आबालवृद्धांच्या उत्साहात न्हाऊन निघाली पंढरी – चेअरमन अभिजीत पाटील

पंढरीनगरीत DVP पंढरपूर मॅरेथॉनचे याही वर्षी यशस्वी आयोजन

खा.ओमराजे निंबाळकर प्रमुख आकर्षण म्हणून आले तेही धावपटूच्या सोबत धावले

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : यशस्वी आयोजनाची परंपरा कायम राखत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अबालवृद्धांच्या उस्फुर्त प्रतिसादात DVP पंढरपूर मॅरेथॉन संपन्न झाली.हजारो नागरिकांनी स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर, सुदृढ पंढरपूर हे ब्रीद घेऊन या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

अगदी ६ वर्षांपासून ते साठी पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह अनेक प्रतिथयश मान्यवर देखील यामध्ये सहभागी झाले होते.धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी देखील २१ किमीचा टप्पा धावत पूर्ण करून फिटनेसचे एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत केले.

खा.ओमराजे निंबाळकर, श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,डॉ.प्रशांत निकम,प्रांताधिकारी गजानन गुरव, विश्वंभर पाटील, डाॅ.मनोज भायगुडे, किरण घाडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

10 किलोमीटर गट ( ओपन गट)
अजित लवटे (32 मिनिट 2 सेकंद )
अमोल नागणे (32 मिनिट 53 सेकंद)
निशांत सावंत( 33 मिनिट 25 सेकंद)

महिला गट-
आर्या काळेल ( 38 मिनिट 38 सेकंद)
वैष्णवी सावंत (38 मिनिट 51 सेकंद)
योगिनी साळुंखे (39 मिनिट 37 सेकंद )

21 किलोमीटर ओपन पुरुष – अंकुश हाके (2 तास 8 मिनिट 50 सेकंद )
विशाल कंबीरे (1 तास 9 मिनिट 25 सेकंद )

महिला गट
साक्षी जेडाल (1 तास 20 मिनिट 6 सेकंद)
अर्चना जाधव (1 तास 23 मिनिट 8 सेकंद)
आकांक्षा शेलार (1 तास 24 मिनिट 8 सेकंद)

झुंबा डान्स सोबतच वारकरी बांधवांच्या पावलीने या उपक्रमात रंगत आणली.

हजारो वर्षांच्या वारकरी संप्रदायाची परंपरेचे केंद्र बिंदू असणाऱ्या आपल्या पंढरपूर मध्ये ही आधुनिक स्वरूपातील आरोग्य वारी अशीच अखंड सुरू राहो आणि या उपक्रमाला चळवळीचे स्वरूप येऊन प्रत्येक पंढरपूर वासियाचे आरोग्य सुदृढ होवो हीच श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना..

दर वर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेमधील सहभाग सातत्याने वाढताना दिसत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विशेषतः युवक काही महिने आधीपासून तयारी सुरू करतात. पहाटे अनेक युवकांचे युवतींचे ग्रुप आपण पंढरपूरमध्ये पाळताना पाहू शकतो. आता ही केवळ एक स्पर्धा राहिली नसून आरोग्याविषयी जन जागृतीचे अभियान झाले आहे.

आरोग्य – आजच्या भाषेत फिटनेस साठी ही स्पर्धा प्रेरणा आणि प्रोत्साहन तर देतेच पण मोठ्या शहरात होते त्याप्रमाणेच उत्कृष्ठ नियोजन आपल्या पंढरपूर मध्ये देखील होऊ शकते, याचाही मापदंड सिद्ध करते.

सहभागी स्पर्धकांना अल्पोपाहार, टी शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी इंजिनियर भारत बलभीम ढोबळे, सचिव बालाजी गणपत शिंदे, खजिनदार विश्वंभर गणपतराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. मंदार सोनावणे ,सहसचिव रेखा सतीश चंद्रराव, सहखजिनदार महेश भोसले,सदस्य डॉ.संजयकुमार सरडे,डॉ.आशिष शहापूरे ,डॉ.चंद्रकांत मगर, डॉ.संगिता शीतल पाटील, किरण घाडगे, भगवंत बहिरट,दिलीप कोरके,गणेश बागल,राजन थोरात ,जयलक्ष्मी संतोष माने ,माधुरी सुरेश माने यासह रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *