आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत कारवाई

आरोपींविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई Action against the accused under Maharashtra Organized Crime Control Act
    पालघर - दिनांक १७/०७/२०२१ पालघर जिल्हयामध्ये दरोडा,जबरी चोरी,घरफोडी,चोऱ्या करणाऱ्या आरोपीविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत खंबीर कारवाई करण्यात आली.दि २४/०६/२०२१ रोजी ००.१५ वा.चे सुमारास फिर्यादी हे मुंबई अहमदाबाद महामार्गाचे मुंबई वाहीनीचे बाजुस ओएफसी टेलीफोन केबल वायर जमीनीत टाकण्यासाठी ट्रेकर मशीनने चेकींग करीत असतांना यातील आरोपी यांनी आपसात संगनमत करुन आर १५ मोटार सायकल नंबर माहीत नाही हीचे वरुन येवुन आरोपी यांनी फिर्यादी सोबत झटापटी करून फिर्यादी यांचे पॅन्टचे डावे खिशातील १२५००/- रु रोख रक्कम व फिर्यादीचे हातातील १००००/- रु किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरीने चोरुन पळुन गेले. नमुद घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर  १३२/२०२१ भादंविस कलम ३९२,३४ प्रमाणे दिनांक २४.०६.२०२१ रोजी ०५.३४ वाजता गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला आहे . नमुद गुन्हयाचा तपास सुरु असुन , सदरचा गुन्हा टोळी प्रमुख आरोपी नामे- गणेश उर्फ बोक लखमा दळवी वय -२० वर्षे रा.उधवा दळचीपाडा ता . तलासरी जि.पालघर व त्यांचे इतर २ टोळी सदस्य यांनी केल्याचे निष्पन्न झाले.गुन्हयातील ०३ आरोपीस पोलीस उप निरीक्षक अंकुश वारुगंसे व अंमलदार यांनी आरोपी यांचे मुळ राहते घरी उधवा दळवीपाडा ता.तलासरी जि.पालघर येथून अटक केली आहे .पालघर जिल्हयातील तलासरी पोलीस स्टेशन तसेच दादरा नगर हवेली केंद्र शासित प्रदेशातील सेलवास व खानवेल या पोलीस स्टेशन मध्ये नमुद आरोपींवर शस्त्रांचा धाक दाखवुन दरोडा टाकणे,जबरी चोरी,घरफोडी,चोरी करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.त्यामध्ये टोळी प्रमुख- गणेश उर्फ बोक लखमा दळवी यांचे विरुध्द- १० व टोळीचा सदस्य संग्राम दिवाल रावते यांचे विरुध्द - ०५ व टोळीचा सदस्य संदेश कान्हा अंधेर यांचेविरुध्द- ०३ असे गंभीर गुन्हे दाखल आहेत . नमुद संघटीत गुन्हेगारी टोळीकडून वर नमूद गुन्हयाव्यतिरिक्त ३ -दरोडा ,१ जबरी चोरी व ५ घरफोडी व १ चोरीचे गुन्हे उघडकिस आले आहेत.

दिनांक ०७/०७/२०२१ रोजी पोलीस अधीक्षक, पालघर दत्तात्रय शिंदे यांनी या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA)१९९९ चे कलम ३(१) (ii) ,३(२) व ३ (४) ही कलम वाढ करणेबाबत पोलीस उप महानिरीक्षक ,कोंकण परिक्षेत्र,नवी मुंबई यांना प्रस्ताव सादर केला होता . संजय मोहिते पोलीस उप महानिरीक्षक , कोंकण परिक्षेत्र ,नवी मुंबई यांनी त्यांचे कार्यालयीन आदेश जा.क्र.१४/वाचक/ ४८११/२०२१,दि १३/०७/ २०२१ अन्वये सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( MCOCA ) १ ९९९ चे कलम ३(१)(ii),३(२) व ३(४) ही कलमे समाविष्ट करणेकामी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) १९९९ चे कलम २३ (१) (अ) अन्वये पूर्व परवानगी दिलेली आहे . दत्तात्रय शिंदे पोलीस अधीक्षक,पालघर व प्रकाश गायकवाड अपर पोलीस अधीक्षक ,पालघर यांचे मार्गदर्शनाखाली तपास धनाजी नलवडे उपविभागीय पोलीस अधिकारी ,डहाणु विभाग यांच्या निर्देशानुसार पोनि/वसावे,तलासरी पोलीस ठाणे,पोलीस उप निरीक्षक अंकुश वारुगंसे तलासरी पोलीस ठाणे व तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस अमंलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: