कुर्डूवाडी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीतून पळालेला फरार आरोपी पकडला Kurduwadi police nabbed a fugitive accused who escaped from court custody
कुर्डूवाडी/ राहुल धोका - माढा सबजेलमधील न्यायालयीन कोठडीतून पळालेल्या चार आरोपी पैकी एका आरोपीस पकडण्यात कुर्डूवाडीचे प्रभारी पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या पथकास यश आले आहे.
दि १९ जुलाई रोजी सकाळी १० वाजता माढा येथील सबजेलमधून चार आरोपी फरार झाले त्या नंतर गोपनीय विभागाचे हरिदास बोराडे यांनी सर्व प्रथम सोशल मिडीयाच्या माध्यमातून आरोपीच्या फोटोसह आरोपी आढळल्यास संपर्काचा संदेश सोडला.
कुर्डूवाडी प्रभारी पोलिस निरक्षक चिमणाजी केंद्रे यांनी तत्काळ सापळा रचण्यास सुरवात केली. दि २० जुलाई रोजी सकाळी ९ वाजता कुर्डूवाडी येथून आरोपी तानाजी नागानाथ लोकरे हा रेल्वे मार्गे पुण्यास पलायन करण्याच्या तयारीत होता.पोलिस निरीक्षक चिमणाची केंद्रे पो.ह. नितीन गोरे ,पोलिस शिपाई दत्ता सोमवाड, सिद्धनाथ वलटे यांनी रचलेल्या सापळ्यात सदर आरोपी अडकला असून त्यास माढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. इतर आरोपी सिद्धेश्वर शिवाजी कोले,अकबर सिद्धप्पा पवार, आकाश नागनाथ भालेराव या आरोपींचे फोटो सोशल मिडीयावर टाकून कुर्डूवाडी पोलिसांनी ९८८१२०१०२१ या मोबाईल अथवा ०२१८३ २७३३२०१० नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन ही पोलिसांनी केले आहे.