Live Radio

लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी तर्फे आषाढी एकादशी भक्तीभावपूर्वक साजरी Lions Club Solapur Twin City celebrates Ashadi Ekadashi with devotion
      सोलापूर,20/07/2021 - लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी व वैष्णवी चँरीटेबल ट्रस्ट जागृत वैष्णवी देवी मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 20/7/2021 रोजी आषाढी एकादशी निमित्त वैष्णवी माता मंदिर वैष्णवी नगर विजापूर रोड सैफुल सोलापूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची पालखी दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये सर्व लहान थोर मंडळी भजन किर्तन व लेझीम सह सहभागी झाले होते. या दिंडीची सांगता माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख व कॅन्सर रोग तज्ञ डॉ शिरीष कुमठेकर यांच्या हस्ते झाली.

 यावेळी वारकर्यांना महाप्रसाद म्हणून लायन्स क्लब ट्विन सिटी च्यावतीने दिंडीतील 100 वारकऱ्यांना राजगिरी लाडू व वेफर्स देण्यात आले. यावेळी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लायन्स क्लब च्यावतीने ला.डॉ शिरीष कुमठेकर यांनी सदर मंदिरास 5001/- रुपये रक्कम देणगी दिली.

यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा ला.सौ नंदिनी जाधव ,सचिव अभियंता सागर पुकाळे,खजिनदार सुनंदा शेंडगे, प्रथम उपाध्यक्ष हिराचंद धुळम, नागेश बुगडे ,ममता बुगडे ,राजीव देसाई , मुकुंद जाधव ,सोमशेखर भोगडे ,औदप्पा पुजारी,राजेश परसगोंड सह वैष्णवी चारीटेबल ट्रस्टी अध्यक्षा निलिमा शितोळे मॅडम, भजनी मंडळाच्या सौ मीनाक्षी पुकाळे व सोलापूर सोशल फाउंडेशन च्या संचालिका मयुरी वाघमारे व पल्लवी माने तसेच देवीचे सेवेकरी संदीप हासे ,श्रीनाथ नळे, सुरेश बिराजदार, सचिन चीनगुंडे यांच्यासह वारकरी आणि सोसायटीतील नागरिक उपस्थित होते. सदर हा कार्यक्रम शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टंसिंग राखत 50-50 लोकांमध्ये घेण्यात आला.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *