General news

पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी प्रशांत माळवदे यांची फेरनियुक्ती

पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांची फेरनियुक्ती

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना,राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती,राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता,प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांसाठी विमा योजना,आरोग्य योजना,अधिस्वीकृती पत्रा मधील जाचक अटी रद्द करणे ,पत्रकारांच्या वाहनांना टोलमधून सूट देणे, पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे, खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी, पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीवतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकारकडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.

पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या मार्गदर्शनानुसार पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी तेज न्यूजचे संपादक प्रशांत माळवदे यांची फेरनियुक्ती केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे .

नूतन सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत माळवदे यांच्या पुढील वाटचालीसाठी राज्य उपाध्यक्ष किरण बाथम, मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटक शंकर माने , पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष वीरेंद्र उत्पात,सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघमारे,रायगड जिल्हाध्यक्ष गौसखान पठाण,सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष म्हेत्रे, ठाणे जिल्हाध्यक्ष काळूराम भोईर, बीड जिल्हाध्यक्ष राहुल धुरंधरे,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मर्दाने ,परभणी जिल्हाध्यक्ष शेषेराव सोपणे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार, दत्ता पाटील,शांतीभूषण झेंडे,सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे ,कोल्हापूर शहराध्यक्ष उमेश जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *