राजकीय न्यूज

पंढरपूर तालुक्यातील सापडलेल्या कुणबी नोंदी प्रदर्शित करा – मराठा महासंघाची मागणी

पंढरपूर तालुक्यातील सापडलेल्या कुणबी नोंदी प्रदर्शित करा – मराठा महासंघाची मागणी

तहसीलदारांना दिले निवेदन

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावातील सापडलेल्या कुणबी नोंदी त्वरीत ग्रामपंचायत कार्यालया समोर प्रदर्शित कराव्यात या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी तहसीलदार सचिन लंगोटे यांना दिले.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयामधील कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम गेले दोन महिने झाले सुरू आहे.मोडी लिपीतील नोंदीचे वाचन युध्द पातळीवर सुरू असल्याचे समजते. परंतु अद्याप कोणत्या गावात किती कुणबी नोंदी सापडल्या याची माहिती आपल्या कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आली नाही.कुणबी नोंदी सापडलेल्या व्यक्तींची माहिती तातडीने प्रत्येक गावच्या तलाठी कार्यालयासमोर सर्वसामान्य मराठा बांधवांना वाचता येईल अशा प्रकारे फलक तयार करून प्रसिद्ध करावी याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयासमोरही प्रदर्शित करावी.पंढरपूर तालुक्यातील मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांना त्वरीत कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

सदरचे निवेदन देताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे, शहर अध्यक्ष अमोल पवार, जिल्हा सचिव गुरुदास गुटाळ, युवक जिल्हाध्यक्ष शिवाजी मोरे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमान कदम,जिल्हा खजिनदार सुहास निंबाळकर, तालुकाध्यक्ष संतोष जाधव,रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नागेश गायकवाड,विलास देठे सर, विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, सोमनाथ झेंड, संतोष घाडगे, अमर शिंदे शहर सचिव सचिन थिटे, शरद जाधव, प्रमोद साळुंखे,विजय देठे,रसूल मुलाने,सुरज रऊळकर, विक्रम कदम, प्रथमेश नलावडे, प्रीतम ठोंबरे, दिगंबर खपाले, प्रदीप जगताप, ऋतुराज भोईकर,विशाल चोपडे, राहुल शिंदे, सिधु गुटाळ,रोशन कदम, अजित कदम आदींसह मराठा महासंघांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *