Uncategorized

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार, मुंबई . व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज: मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ५३ च्या माजी नगरसेविका रेखा रामवंशी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज  शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच यावेळी राज्य ग्रंथालय महासंघाचे बी. जी. देशमुख यांच्यासह त्यांच्या संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

राज्यातील महायुती सरकारने केलेल्या लोकाभिमुख कामांवर विश्वास ठेवूनच आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या ५३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून दिवसागणिक ही संख्या वाढत आहे. मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहराचे सुशोभीकरण, संपूर्ण स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम राबवण्यात येत असून हे शहर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर ठरावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना सचिव संजय मोरे, माजी आमदार शरद सोनवणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *