शेतकरी : शेती अन जगणं ……

शेतकरी : शेती अन जगणं ………..

हवामान अंदाज
कधी जमेस धरता येत नाही
झालेल्या नुकसानाने हाती
काय उरत नाही !!

२.आमच दुःखण पाहून
कोणीही रडत नाही
आम्ही जळत आहोत
हे कोण पहात नाही !!

३.तोंडातला घास मातीत जातो
हे कोणालाही कळत नाही
शेतीत अंदाज बांधून
गणित मांडता येत नाही !!

४.नुकसानीचा पंचनामा होतो
पदरात कांहीच पडत नाही
कर्जाशिवाय पुढचं पाऊल
टाकता येत नाही !!

५.बाजारात भाव नाही
खर्चाची पूर्तता होत नाही
पीकवनारापेक्षा विकणारास फायदा
अर्थशास्त्र कळत नाही!!

६.पिकलच तरच ओंजळीत घेतो
नाहीच पिकल तर
विठोबावर हवाला ठेऊन
पुन्हा पुन्हा पेरतो !!

७.विम्याच कवच वेळेत समजत नाही
समजलं तरी हप्ते भरता येत नाही !!

८.आत्महत्येचा विचार
डोक्यात पिंगा घालतो
पण परिवार काळ्या आईच्या ओढिने
आत्मविश्वासाने श्रमाचे आड उपसत रहातो !!

आनंद कोठडीया,
कृषीरत्न,९४०४६९२२००,

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: