राजकीय न्यूज

आ.जितेंद्र आव्हाड जाणीवपूर्वक वाक्याचा विपर्यास करून राजकारण करतात- श्रीकांत शिंदे

आ.जितेंद्र आव्हाड जाणीवपूर्वक वाक्याचा विपर्यास करून राजकारण करतात- श्रीकांत शिंदे

बा विठ्ठला आव्हाडांना सद्‌बुद्धी दे म्हणत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने बदाम वाटत केला निषेध

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काळजीपोटी केलेल्या वक्तव्याचा शरद पवार गटाचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक विपर्यास करून त्या शब्दाचे राजकारण आ जितेंद्र आव्हाड करीत आहेत. वास्तविक पाहता अजितदादांना बदनाम करण्याचे षडयंत्र गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते प्रामुख्याने करताना दिसत आहेत.मुळात उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत गेल्यापासून महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी अतिशय चांगले निर्णय घेत असताना कामाच्या बाबतीत अजितदादांची बरोबरी करू शकत नाहीत म्हणून असे खालच्या पातळीवर जाऊन शब्दाचा विपर्यास करून बदनाम करण्याचा डाव आ.जितेंद्र आव्हाड हे वारंवार करीत आहेत.याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अजित पवार गटाच्यावतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांना विठ्ठलाने सद्बुद्धी द्यावी म्हणून विठ्ठलाला दुधाचा अभिषेक करून भाविकांना बदाम वाटप करण्यात आले.

बदाम खाल्ल्याने बुद्धी तलक आणि चाणाक्ष होते.त्यामुळे आ.जितेंद्र आव्हाड यांचीसुद्धा विठ्ठलाने बुद्धी तल्लक करावी म्हणून हे अनोखे आंदोलन करण्यात आले.जितेंद्र आव्हाड हे वारंवार काही तरी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येण्याचा प्रयत्न करीत असतात. मध्यंतरी प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त करून आव्हाड यांनी त्यांची बुध्दी कशी आहे हे त्यांनी दाखवून दिले होते आता तर अजितदादांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने त्याचा अनोखा निषेध करून परमात्मा श्री विठ्ठलास दुधाने अभिषेक घालून भाविकांना बदामाचे वाटप करण्यात आल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सुरज गंगेकर ,जिल्हा सरचिटणीस सूरज पेंडाल, शहराध्यक्ष अमोल परबतराव,कार्याध्यक्ष शुभम पवार ,शुभम उपळकर ,रफिक मुलाणी,विकी गंगेकर,मजर खान,ओंकार टमटम,अभिषेक टमटम, महेश भिगारे,माऊली कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *