स्मारकास लागणार्‍या सर्व बाबींची पूर्तता करुन ते पूर्ण करून घेण्याचे आमदार समाधान आवताडेंचे अभिवचन

मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक संदर्भात आमदार समाधान आवताडे यांची श्रीशैलमामा हत्तुरे यांच्या घरी चर्चा MLA Samadhan Avtade discusses Mahatma Basaveshwar Smarak at Mangalvedha
     सोलापूर दि.21 जुलै 2021: होटगी रोड विमानतळ जवळील हत्तुरे नगर येथील महात्मा बसवेश्वर सामाजिक संस्था, जुळे सोलापूरचे संस्थापक तथा जेष्ठ समाजसेवक श्रीशैल मामा हत्तुरे यांच्या घरी मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघाचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी कौटुंबिक भेट घेतली. 

       या भेटीप्रसंगी मंगळवेढा येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विश्वगुरु महात्मा बसवेश्वर कृषी पर्यटन केंद्राच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. महात्मा बसवेश्वरांच्या स्मारका मध्ये कोणकोणते विषय अंतर्भूत असावे या विषयी हत्तुरे मामांनी अभ्यासपूर्ण माहिती आमदार समाधान आवताडे यांना दिली. 

      त्यानुसार स्मारकासाठी लागणार्‍या सर्व बाबींची लवकरात लवकर पूर्तता करण्यात येऊन ते पूर्ण करून घेण्याचे अभिवचन आमदार समाधान आवताडे यांनी दिले आहे अशी माहिती महात्मा बसवेश्वर सामाजिक संस्था,जुळे सोलापूरचे संस्थापक तथा जेष्ठ समाजसेवक श्रीशैल मामा हत्तुरे यांच्यावतीने देण्यात आली आहे. 

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: