पोलिस विभागाच्या नविन वाहनांचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण
पोलिस विभागाच्या नविन वाहनांचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण Dedication of new vehicles of Police Department by Guardian Minister Sunil Kedar

वर्धा / जिमाका :- पोलिस विभागास जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतुन खरेदी करण्यात आलेल्या 13 नविन चारचाकी वाहनाचे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांचे हस्ते लोकार्पण व पोलिस विभागाच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, सर्वश्री आमदार अभिजित वंजारी,रणजित कांबळे,दादाराव केचे,जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार,जिल्हा पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर,अपर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंके, वाहन शाखाप्रमुख पोलिस निरिक्षक महेश मुंढे, राखीव पोलिस निरिक्षक शालिक उईके व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना 2020- 21च्या नाविन्यपूर्ण योजनेतुन प्राप्त झालेल्या निधीतून 13 वाहने खरेदी करण्यात आली आहेत. यापूर्वी 8 वाहने असे एकूण 21 वाहने पोलिस विभागास प्राप्त झाली आहे. सदर वाहने जिल्हयातील 19 पोलिस स्टेशनला हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे पोलिस विभागाचे वाहन शाखा प्रमुख श्री. मुंढे यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांचे हस्ते पोलिस मुख्यालयातील मैदानावरील जागेवर नव्याने बांधण्यात येणा-या पोलिस विभागाच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन करण्यात आले.