Crime news

ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार

दहिसर गोळीबार प्रकरणात ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार

मुंबई – दहिसर गोळीबार प्रकरणात ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलाय Dahisar Firing Abhishek Ghosalkar. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा संशय आहे.गंभीर अवस्थेतल्या अभिषेक घोसाळकरांना दहिसरच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे.

मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर हे फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मॉरिस भाईने अभिषेक घोसाळकरांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. या गोळीबाराचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या गोळीबारानंतर मॉरिस भाईनेही स्वत:वर चार गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती प्रथमदर्शनी दिसत आहे. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाने उपनेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.

एक समाजसेवक म्हणून मॉरिस नरोना ऊर्फ मॉरिसभाई स्वतःची ओळख करून देत असे. मॉरीस भाई बोरिवली पश्चिमेच्या आयसी कॉलनीतील रहिवाशी आहे.मॉरीसवर बलात्कार,खंडणी आणि फसवणुक असे विविध गुन्हे दाखल आहेत.

एका महिलेची ८८ लाखांची फसवणूक करुन या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप मॉरीसवर असल्याचे समोर आले आहे.त्याने वॉर्ड नंबर १ मधून महापालिकेची निवडणूक लढवली होती.तो समाजसेवा करत लोकांना कपडे फळ आणि धान्य वाटण्याचं काम करत होता.आज या दुर्दैवी घटनेवेळीही अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकरांनी उपस्थिती लावली होती तेव्हा ही घटना घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *