सामाजिक न्यूज

मातीशी नाते,मायभूमीत श्रम, जीवनाचे आनंदी रूप,निसर्गाच्या सानिध्यात,कार्याशी धेय निष्ठा,जिव्हाळ्याची माणसे ही तर माझ्या जीवनाचे अंग

मातीशी नाते,मायभूमीत श्रम, जीवनाचे आनंदी रूप,निसर्गाच्या सानिध्यात,कार्याशी धेय निष्ठा,जिव्हाळ्याची माणसे ही तर माझ्या जीवनाचे अंग आहे.

सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – आज 8-2-24 रोजी सरकोली पर्यटन स्थळ येथे टीचर्स गार्डन मध्ये तन वाढल्याने ते खुरपण्यासाठी मी,ह.भ.प.शिवाजी महाराज, आण्णासाहेब भोसले सर व बाल मित्र बसलो होतो.त्यावेळी एक गोष्ट माझ्या मनात चमकून गेली ती म्हणजे मी माझ्या स्वता:च्या शेतात कधीही खुरपे ,टिकाव,खोऱ्या हातात धरला नाही व आई वडीलांनीही कधी शेतीचे काम मला करायला लावले नाही.

परंतु सरकोली पर्यटन स्थळावर पाऊल ठेवताच समोरची परिस्थिती पाहून आपोआप हातपाय खुरपे,टिकाव,खोऱ्याकडे वळतात. श्रमदानास सुरवात होते.वेळ कसा गेल्याचेही कळत नाही.तहान,भुक हरवून जाते.कितीही काम केले तरी कंटाळा येत नाही.आणखी वेळ पाहिजे होता आणखी थोडे काम झाले असते असे वाटत राहते.इथले काम माझ्या अंगात उर्जा निर्माण करते. इथला उगवणारा सूर्य जसा पहावा वाटतो तसा मावळणारा सुर्य पाहावसा वाटत नाही.कारण आणखी श्रमदान करावसे वाटते.

सरकोली पर्यटन स्थळ निर्मिती हा माझा आणि गावकऱ्यांचा श्वास आणि ध्यास आहे. इथल्या जिव्हाळ्याच्या माणसांमुळे मला ही शक्ती मिळते.ही माझी जशी इच्छाशक्ती आहे तशीच इथल्या सर्व गावकरी बांधवांची आहे. तेही इथे राब राबतात.त्यांना येथे काम करताना कोणताही संकोच वाटत नाही.तेही आनंदाने श्रमदान करतात.

 

सरकोली ता पंढरपूर हे ऐतिहासिक व पुरातन गाव आहे.आमच्या कित्येक पिढ्या या गावात घडल्या.त्यांचे संस्कार,मार्गदर्शन,प्रेम, जिव्हाळा आम्ही विसरलो नाही.त्यांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत.आमच्या गावातील बंधू,भगिनी गावाचं नाव जागतिक स्तरावर नेण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात काबाडकष्ट करत आहेत.आमच्या गावास निसर्गाने माण,भिमा व गुप्त कृष्णा नद्या दिल्या,सुपीक जमीन दिली,सोन्यासारखी माणसे घडवली.या निसर्गाचे उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही.याची काहीतरी परतफेड आमच्याकडून व्हावी असे आम्हाला वाटते.म्हणून आम्ही निसर्ग संवर्धनासाठी अहोरात्र काम करत आहोत. बर निसर्ग त्याच्यासोबत काही घेऊन जात नाही तोही आम्हालाच देतो.फक्त आम्ही त्याच्याशी प्रामाणिक राहण्यासाठी प्रयत्न करतो. आमच्या हातून या मातीशी इमानदारी राहावी,गावाची सेवा घडावी आणि पुढील पिढीला सुसंस्कार मिळावेत हीच इच्छा व्यक्त करतो.

विलास श्रीरंग भोसले– मा.पोलीस अंमलदार 9923433535.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *