राजकीय न्यूज

मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समितीच्या सदस्य संचालकपदी प्रणव परिचारक

भाजपा महाराष्ट्र प्रदेश, पक्षनेतृत्व आणि माजी आ.प्रशांत काका यांच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली – प्रणव परिचारक

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – मागील आठवड्यात केंद्रीय रेल्वे विभागातील मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती (ZRUCC) च्या सदस्य संचालकपदी भाजपा युवा नेते प्रणव परिचारक यांची निवड करण्यात आली.

या निवडीनंतर बोलताना युवा नेते प्रणव परिचारक यांनी भाजपा महाराष्ट्र प्रदेश, पक्षनेतृत्व आणि माजी आ.प्रशांत काका परिचारक यांच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली आहे.नुकतीच मुंबई येथे मध्य रेल्वेच्या कार्यालयात सदस्य संचालकपदाची कर्तव्यसूत्र हाती घेतली. यानंतर मध्य रेल्वेचे उप-महा प्रबंधक (Deputy Genaral Manager, central Railway, Mumbai ) अभय मिश्रा यांची सदिच्छा भेट घेत महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील राज्यांमध्ये विस्तार असणाऱ्या या समितीच्या कारभाराची माहिती जाणून घेतली.यावेळी रेल्वे विभागातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली असून पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध विषयांवर तसेच नविन गाड्या सुरू करण्यासंदर्भात देखील चर्चा झाली.माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला तीन राज्यांचा विस्तार असणाऱ्या केंद्राच्या मोठ्या समितीवर काम करायची संधी मिळणे ही माझ्या सर्वसामान्य जिवाभावाच्या सहकारी कार्यकर्ते, मित्रांच्या शुभेच्छा आणि सदिच्छांचे फळ आहे असे मी मानतो असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *