धोकादायक ठिकाणी वसलेल्या झोपडी वासीयांचे सूरक्षित स्थळी पुनर्वसन करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

धोकादायक ठिकाणी वसलेल्या झोपडीवासीयांचे सूरक्षितस्थळी पुनर्वसन करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Union Minister of State Ramdas Athawale said that slum dwellers should be rehabilitated in a safe place
दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची आठवलेंनी घेतली सांत्वनपर भेट
  मुंबई दि.23/07/2021 - अतिवृष्टीने दरड कोसळून चेंबूर आणि विक्रोळी येथे नुकतीच दुर्घटना घडली. त्यात अनेक जण मृत्यूमुखी पडले. मुंबईत अतिवृष्टीने दरड कोसळण्याच्या अनेकदा दुर्घटना घडून शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत.त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई ,ठाणे आदी महानगर क्षेत्रातील डोंगराळ धोकादायक ठिकाणी वसलेल्या झोपडीवासीयांचे सुरक्षितस्थळी कायमचे पुनर्वसन करावे यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार आहोत. डोंगराळ भागात प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन योजना लवकर पूर्ण करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी सूचना आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

 चेंबूरच्या भारतनगर येथील भिंत कोसळून 20 जणांचा मृत्यू झाला.त्यांच्या कुटुंबियांची ना. रामदास आठवले यांनी आज भारत नगर येथे सांत्वनपर भेट घेतली. यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, नगरसेविका निधी शिंदे,विष्णू मस्के, तानाजी गायकवाड, संजय डोळसे, बाळासाहेब गायकवाड, रवी गायकवाड, साहेबराव ससाणे, राक्षे आदी उपस्थित होते. 

  दरड कोसळून मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे 5 लाखांच्या मदतीचा धनादेश आज देण्यात आला. तसेच केंद्र सरकार तर्फे 2 लाखांचा निधी लवकर देण्यात येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. शासनाच्या 5 लाख रुपयांच्या निधीने दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांचे प्राण पुन्हा येणार नाही त्यामुळे अशा दुर्घटनेत कुणाचा मृत्यू होऊ नये, अशा दुर्घटनाच होऊ नयेत यासाठी डोंगराळ भागातील धोकादायक ठिकाणच्या झोपड्यांचे कायमस्वरूपी सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवे.दुर्घटनेत घरे गमावलेल्या झोपडीवासीयांना शाळांमध्ये तात्पुरते स्थलांतरित केले आहे. तेथे कोणतीही सुविधा नसल्यामुळे या दुर्घटनाग्रस्त झोपडीवासीयांचे मुंबई मनपा,एमएमआरडीए, एसआरए या प्राधिकरणाचा समन्वय साधून तात्पुरत्या घरांमध्ये स्थलांतरित करावे अशी सूचना ना रामदास आठवले यांनी केली. चेंबूर आणि विक्रोळी सुर्यनगर येथे भेट दिल्यानंतर ना. रामदास आठवले यांनी शिवाजीनगर गोवंडी येथे दुमजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

कोकण ,पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सतत जोरदार पाऊस होत असल्याने राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.कोकणात चिपळूण महाड तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हयात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. त्यांना केंद्र सरकारतर्फे भरीव मदत मिळवून देऊ असे सांगत राज्य सरकारने पूरग्रस्तांना आर्थिक मदत त्वरीत दिली पाहिजे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.विक्रोळी सुर्यनगर येथील दुर्घटना ग्रस्तांना ना. रामदास आठवले यांनी भेट दिली त्यावेळी रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड,राजेश सरकार,बाळ गरुड (पवई),सलीम खान, संदेश मोरे, आरिफ तांबोळी, मीना पवार, सत्यवान इंगळे, शांतीलाल बोरुडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: