उपमुख्यमंत्री अजित पवार वाढदिवसा निमित्त सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर 501 रोपांचे वृक्षारोपन 501 saplings planted at Sahakar Shiromani factory on the occasion of Deputy Chief Minister Ajit Pawar’s 62nd birthday

भाळवणी ,22/07/2021 :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त्‍त विविध 501 रोपांचे वृक्षारोपन कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे , व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे व आजी माजी संचालक यांचे हस्ते करण्यात आले.

प्रत्येकांनी आपला वाढदिवस इतर खर्चाला फाटा देवून, आलेल्या पाहुण्यांना, मित्र-मैत्रीणींना एक रोप भेट देवुन वाढदिवस साजरा करुन, निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करावी असे आवाहन कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.

यावेळी कारखान्याचे संचालक मोहन नागटिळक,बाळासाहेब कौलगे, भारत कोळेकर, राजाराम पाटील, विलास जगदाळे, योगेश ताड, इब्राहिम मुजावर, नागेश फाटे, माजी संचालक महादेव देठे, प्रताप म्हेत्रे, यशवंत सहकारी पतसंस्थेचे नुतन चेअरमन शहाजी साळुंखे आदीसह कार्यकर्ते तसेच कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक , खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: