Crime news

उपविभागीय पोलिस अधिकार्यांच्या घरी घरफोडी प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

उपविभागीय पोलिस अधिकार्यांच्या घरी घरफोडी प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील शासकीय वसाहत येथे घरफोडी केल्या प्रकरणी बाज्या बापू उर्फ विजय पवार व शाहरुख विजय पवार दोघे रा.आटपाडी जि.सांगली यांची पंढरपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

या हकीकत अशी की,अनिल मारुती जगताप यांच्या घरी दिनांक ९ डिसेंबर २०२१ ते १० डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ – ०० वाजण्याच्या दरम्यान घराच्या दरवाजाचा कोंयडा तोडून यातील आरोपी बाज्या बापू उर्फ विजय पवार व शाहरुख विजय पवार यांनी आमचे घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोटरसायकल चोरून घरफोडी केल्याची आणि आमचे शेजारील हनुमंत जालिंदर भोसले यांच्याही घरी याच दरम्यान या चोरट्यांनी घराचा कोंयडा उचकटून आत मध्ये प्रवेश करून घरातील कपाटातील व माळ्यावरील सामान उचकटून मुद्दाम लबाडीने तसेच कंपाउंड च्या आत लावलेली चावी सह मोटरसायकल असा एकूण १०७५०/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

अशी फिर्याद अनिल मारुती जगताप यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ३८०, ४५४, ४५७, ४११ व ३४ प्रमाणे दाखल केलेली होती. अनिल जगताप यांचा मुलगा शिरीष जगताप हे सी.आर.पी.एफ.मध्ये DYSP म्हणून कार्यरत आहेत.

या गुन्ह्याचे तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचा तपास करून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.त्यावरून आरोपी बाज्या बापू उर्फ विजय पवार हा पुणे येथील येरवडा कारागृह येथे दोन वर्षापासून तर शाहरुख विजय पवार हा पंढरपूर येथील सब जेलमध्ये होता. आरोपी नं. ३ मल्हारी उर्फ पप्पू महादेव जाधव रा.माळशिरस याची जामिनावर सुटका झाल्यानंतर मयत झाला आहे. त्यामुळे आरोपी नं. १ व २ च्या विरुद्ध केस चालविण्यात आली. या केसमध्ये फिर्यादी, दोन पंच, साक्षीदार, तपास अधिकारी यांचे जबाब नोंदविण्यात आले होते.

सदर केसच्या सुनावणीच्या वेळेस ॲड. किर्तीपाल सर्वगोड यांनी सदर आरोपी विरुद्ध घरफोडी केल्याबद्दलचा सकृतदर्शनी कोणताही पुरावा नसल्याचा व आरोपींना प्रत्यक्षात घरफोडी करताना कोणी पाहिल्याचा पुरावा नाही असा युक्तिवाद मांडला, तो ग्राह्य धरून पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायाधिश श्रीमती सोनल साळुंखे यांनी सबळ पुराव्या अभावी या गुन्ह्यातून आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे.

यामध्ये आरोपींतर्फे ॲड.किर्तीपाल सर्वगोड, ॲड संदिप सुरवसे यांनी तर सरकार तर्फे ॲड.डी.एम.शेख यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *