Cyber crime awaerness

व्हाईस क्लोनिंग फ्रॉड पासून सावध रहा-ॲड.चैतन्य भंडारी

व्हाईस क्लोनिंग फ्रॉड पासून सावध रहा- ॲड.चैतन्य भंडारी

धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज- सध्या टेक्नालॉजी ही अत्याधुनिक झाली आहे. त्याचा फायदा सायबर गुन्हेगारांनी घेण्यास सुरुवात केली आहे असाच एक प्रकार म्हणजे व्हॉईस क्लोनिंग.

आपल्याला प्रश्न पडला असेल की व्हॉईस क्लोनिंग म्हणजे नेमके काय ?

व्हॉईस क्लोनिंग म्हणजे आपला आवाज हुबेहुब वापरुन आपले मित्र नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींना आपल्या नावाने पैशांची मागणी करणे होय . अलीकडे बहुतांश लोकांसोबत व्हॉईस क्लोनिंग फ्रॉड झाल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. बरेच नागरिक व्हॉईस क्लोनिंग फ्रॉडला बळी पडल्याचे दिसत आहे.

जर आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींच्या नावाने अज्ञात नंबरवरुन कॉल येतो आणि आपल्याला सांगण्यात येते की, मी अमुक बोलतोय मी थोडा अडचणीत आहे किंवा माझे ॲक्सीडेंट झाला आहे त्यामुळे मला त्याकरीता अर्जंट काही रक्कम या नंबरवर टाका असे तो सांगतो आणि तेथेच याला आपण बळी पडतो. कारण तो अज्ञात नंबर सायबर गुन्हेगारांचा असतो आणि ते आर्टीफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करुन सायबर गुन्हेगार आपल्या जवळच्या व्यक्तींचा हुबेहुब आवाजाचा गैरवापर करुन नागरिकांना फसवण्याचा एक नविन फंडा सायबर गुन्हेगांरानी शोधला आहे. म्हणून जर आपल्याला अज्ञात नंबरवरुन आपल्या जवळच्या व्यक्तीचा पैशांसाठी कॉल आला असेल तर त्याबाबत आपल्या मित्राच्या ओरीजनल नंबरवर कॉल करुन त्याबाबत खात्री करा आणि त्यानंतरच आर्थिक व्यवहार करा.

त्यामुळे नागरिकांनी व्हॉईस क्लोनिंग फ्रॉड पासून सावध रहावे असे आवाहन सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *