sportsक्रीडा न्यूज sports

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पंढरपूर अंध शाळेतील विद्यार्थ्यांचे यश

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पंढरपूर अंध शाळेतील विद्यार्थ्यांचे यश

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10/02/2024 – जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष साह्यता विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावतीने दि.५ व ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सोलापूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यात जिल्ह्यातील ३६ शाळांमधील १००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. अंध प्रवर्गातून विविध खेळात शाहिद मेजर कुणाल गोसावी पंढरपूर अंध शाळेतील मुलांनी विशेष यश संपादन केले आहे -१ कु प्रियांका राजेंद्र एडके धावणे क्र.१
२ कु ऐश्वर्या राजेंद्र एडके धावणे क्र.१
३ कु सुवर्णा प्रभाकर गायकवाड धावणे क्र.१
४ कु सुवर्णा प्रभाकर गायकवाड गोळाफेक क्र.१
५ कु प्रियांका अजिनाथ गोडसे गोळाफेक क्र.१
६ चि सोहम महेश माने लांब उडी क्र.१
७ चि शरद दामोदर उबाळे पासिंग द बॉल क्र.१

याशिवाय विविध क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे ६ व तृतीय क्रमांकाचे ६ असे एकूण १९ बक्षिसे मुलांनी मिळविले. या अंध मुलांना रोहिणी घोडेक मॅडम,उमा कुलकर्णी मॅडम,महेश म्हेत्रे सर,निवास समिती सहभाग नितीन कटप सर,सुनील व्यवहारे,अनिल कुंभार,शोभा ताई यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल अंध विकास संस्था पंढरपूर संचालित शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंध शाळा पंढरपूर चे अध्यक्ष मुन्नागीर गोसावी,मुख्याध्यापक संतोष बाराहाते अंध शाळा पंढरपूर यांनी या मुलांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *