उपमुख्यमंत्री अजित पवार वाढदिवसा निमित्त दादाश्री फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त दादाश्री फाऊंडेशनच्यावतीने १०६२ झाडांचे वृक्षारोपण 1062 trees planted by Dadashri Foundation on occasion of Deputy Chief Minister Ajit Pawar’s birthday
   करमाळा - करमाळा जि.सोलापूर येथे 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त येथील दादाश्री फाऊंडेशनच्यावतीने १०६२ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .या वृक्षारोपणा वेळी जांभूळ ,वड पिंपळ,चिंच, नंध्रुकी यांच्यासह पंधरा प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे व फाऊंडेशनचे काका काकडे यांचे आमदार संजय शिंदे यांनी कौतुक केले . वृक्षारोपणावेळी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सोमनाथ लोहार , जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे , महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे , यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे ,सतीश शेळके ,तानाजी झोळ, वीटचे सरपंच उदय ढेरे ,कोर्टीचे सरपंच नीलेश कुटे , अभयसिंह राजेभोसले,राष्ट्रवादीचे नितीन झिंजाडे , शिवाजी जाधव, गलांडे , इक्बाल इनामदार ,अर्जुन ढेरे , दादाश्री फाऊंडेशनचे केशव जाधव ,माधव जाधव, शशिकांत शिंदे ,गणेश खुळे आदी उपस्थित होते .

दादाश्री फाऊंडेशनमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात . चालू वर्षी एकूण दीड हजार वृक्षांची  लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ४५०० झाडे लावण्यात आली आहेत - दादाश्री फाऊंडेशनचे संस्थापक काका काकडे

 यावेळी दादाश्री फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते . 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: