Charoli चारोळी

गावरान चिमटा पंचनामा

गावरान चिमटा :

देशात श्रमिकांना भ्रांत आहे जगण्यासाठी दोन वेळा भाकरीची
श्रींमताना चिंता आहे त्यांच्या रक्तातील वाढत्या साखरेची!!

राजकारण्यांना मोह आहे फक्त सत्तेचा
कर्मचाऱ्यांना काळजी सातव्या वेतन आयोगाची !!

सर्वाना काळजी स्वतःच्या सुखाची
कोण काळजी करतो श्रमिकांची !!

सत्तेसाठी संविधान हवे तसे दुरुस्त करत आहेत
मूळ गाभा अदृश्य नवं संविधान पाहिजे तसं करत आहेत !!

मुखी राम तर कृतीत आसाराम आहे
कोणावर विश्वास ठेवावा प्रश्न आहे !!

आनंद कोठडीया, जेऊर 
९४०४६९२२००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *