Crime news

सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांची समय सूचकता व चिकित्सक वृत्तीमुळे अल्पवयीन मुलीची अपहरणकर्त्याच्या ताब्यातून सुटका

प्रवासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांची समय सूचकता व चिकित्सक वृत्तीमुळे अल्पवयीन मुलीची अपहरणकर्त्याच्या ताब्यातून सुटका

              सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे

मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज – दि 08/02/2024 रोजी बलभीम ननवरे सहायक पोलीस निरीक्षक नायगाव,प्रतिनियुक्तीने इलेक्शन सेल, अभियान,बृहन्मुंबई हे पोलीस उपआयुक्त यांचे परवानगीने कोर्ट साक्ष कामी जिल्हा सत्र न्यायालय शिवाजीनगर कोर्ट, पुणे येथे सिंहगड एक्सप्रेस ने जात असताना ट्रेन मध्ये एक 30 वर्षीय व्यक्ती एका 8 वर्षाच्या मुलीला घेऊन प्रवास करत असताना दिसला. प्रवासा दरम्यान ते एकत्रित डब्ब्यात होते.सदर व्यक्ती त्या मुलीला तिने न मागताही खेळणी toys, खाऊ घेऊन देत होता. त्यामुळे मुलगीही त्याच्या सोबत खुशीने प्रवास करीत असल्याचे दिसत होते. परंतु मुलगी मराठी बोलत होती तर सदर व्यक्ती हिंदीतून बोलत होता.ती मुलगी बलभीम ननवरे सहा पोलीस निरीक्षक यांच्या सिट seat जवळच उभी असल्याने तिला बसायला त्यांनी शेजारी जागा देऊन मुलीला आईविषयी विचारणार केली असता आई घरी असल्याचे तिने सांगितले.तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांनी सदर व्यक्ती तिचा बाप असावा असे समजून तिला बोलत होते.पण ती व्यक्ती हिंदी भाषिक असल्याने सदर व्यक्तीला मुलगी तुमची कोण आहे अशी विचारणा केली असता त्याने माझीच मुलगी असल्याचे सांगितले परंतु त्याचवेळी मुलीचा चेहरा सदर व्यक्ती तिचा बाप नसल्याचे सांगत होता.सहा. पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे मुलीबरोबर गप्पा मारत असताना सदर व्यक्ती मुलीला डोळे वटारून माहिती देण्यापासून रोखत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मुलीला तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मागितला.त्यावेळी सदर व्यक्ती पुन्हा तिला खुणावत असल्याचे दिसले.विनाकारण आपण चौकशी करत असल्याने बापाला आवडत नसावे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे मोबाईल मध्ये बघत बसले त्यावेळी मोबाईलमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांचा युनिफॉर्म वरचा फोटो पाहून मुलीने आश्चर्याने विचारले की तुम्ही पोलीस आहात त्यावेळी त्यांनी हो म्हणून मान हलवली. मुलीच्या आई ला मुली सोबत बोलणं करून द्यावं आणि नवरा बायकोच जमत नसावे आणि बाप मुलीला घेऊन जात आहे का याचं कारण शोधण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांनी तिला तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मागितला असता तिने मामाचा मोबाईल क्रमांक सांगितला.

                               दयानंदकुमार शर्मा

त्यावेळी ती व्यक्ती मुलीला घेऊन जाण्यास निघाली तेंव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांनी त्यास पुन्हा नाते विचारले असता त्याने माझी ही बहीण असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला पकडून खाली बसवले व मुलीच्या मामाला कॉल करून विचारपूस केली असता काही वेळातच मुलीच्या आई वडिलांचा कॉल आला आणि मुलगी घरातून शाळेला गेलेली मात्र ती परत आली नसल्याचे सांगितले.

त्यावेळी त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांनी त्यांची ओळख सांगत मुलगी सुखरूप असून मुलगी सुरक्षित पुणे लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करू असे सांगून मुलीचे आई वडिलांना वालीव पोलीस ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार येथे गुन्हा दाखल करण्यास सांगितले. लोहमार्ग पोलीस ठाणे येथे ट्रेन मधील नागरिकांच्या मदतीने (लोणावळा पासून लोहमार्ग चा एक अंमलदार मदतीला लोहामार्ग नियंत्रण कक्षाकडून मिळाला ) मुलगी व आरोपीला पुणे स्टेशन येथे लोहमार्ग पोलिसांचे ताब्यात सुखरूप दिले आहे. मुलीचा मामा सचिन शेलार यास पुणे स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांनी बोलावून घेतले होते.

वालीव पोलीस ठाणे गु र नं 79/2024, कलम 363 भा द वि नुसार दाखल करण्यात आला आहे.या आरोपीचे नाव दयानंदकुमार शर्मा, वय अंदाजे 30 वर्षे, रा – मूळ बिहार असे असल्याचे समजते.

सहा पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांची समय सूचकता व चिकित्सक वृत्तीमुळे अल्पवयीन मुलीची अपहरणकर्त्याच्या ताब्यातून सुखरूप सुटका झाली.त्यांच्या या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *