पंढरपूरातील बेघर लोकांना निलेश जाधव मित्र परिवाराच्या अन्नदान

पंढरपूरातील बेघर लोकांना निलेश जाधव मित्र परिवाराच्या अन्नदान Nilesh Jadhav Mitra family donates food to homeless people in Pandharpur
पंढरपूर /नागेश आदापुरे - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे तसेच दरडी कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेतील जिवित हानीमुळे राज्याच्या भाजपा नेत्या पंकजाताई मुंढे यांनी वाढदिवस साजरा न करता नुकसानग्रस्तांना मदतीचे आवाहन केले होते. 

भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनी वाढदिवसा निमित्त केलेल्या या आवाहनास प्रतिसाद देत निलेश जाधव मित्र परिवार, पंढरपूर यांच्यावतीने पंढरपुर शहरातील बेघर नागरिकांना अन्नदान करण्यात आले .

 याप्रसंगी अँड.ओंकार जोशी ,युवक नेते अक्षय वाडकर ,उमेश सर्वगोड, प्रशांत सर्वगोड ,रिपाईचे जेष्ठ नेते प्रविण माने यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होता .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: