माळशिरस तालुका युवासेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य शिबिर

युवासेनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त संगम येथे २१७ रुग्णांनी मोफत घेतला लाभ

अकलूज /नागेश आदापूरे – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना माळशिरस तालुका प्रमुख गणेश इंगळे आणि युवासेना उपजिल्हाप्रमुख सोनू पराडे पाटील यांच्यावतीने संगम येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.या शिबिराचे उदघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे व डॉ एम के इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.

  या शिबिरामध्ये २१७ गरजू आजारी व्यक्तिंनी  लाभ घेतला .या शिबिरास डॉ एम के इनामदार , डॉ नितीन राणे ,डॉ समीर बंडगर ,डॉ विश्वास कदम,डॉ विवेक गुजर ,डॉ तानाजी कदम , डॉ संतोष खडतरे ,डॉ सुरज महाडिक,डॉ श्रीकांत कल्याणी , डॉ किरण गोरडे ,डॉ अतुल मिटकल, डॉ अर्जुन शिंदे ,डॉ विद्या नाईकनवरे मँडम , डॉ गायत्री धोत्रे मँडम या डाँक्टरांनी रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा दिली.

या शिबिरास शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर , शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुका प्रमुख यशश्रीताई पाटील , शिवसेना विभाग प्रमुख पिंटू चव्हाण ,राम गायकवाड ,प्रशांत पराडे, मल्हारी इंगळे, सागर इंगळे , कल्याण इंगळे,बंडु ताटे , सतीश इंगळे, प्रशांत पराडे,अमोल पराडे, राहुल महाडिक, समाधान पराडे, लक्ष्मण इंगळे, नवनाथ इंगळे, अमोल भोई, दयानंद इंगळे,ओम पराडे, अविनाश भोई,विकास भोई,बबलू इंगळे,दिपक भोई, ऋषिकेश पराडे, रोशन पराडे, स्नेहल पराडे, आदीसह शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. नागनाथ साळवे यांनी सर्व उपस्थित डॉक्टर व पदाधिकारी यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: