मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस ६१ किलोचा मोदक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस ६१ किलोचा माव्याचा मोदक On the occasion of Chief Minister Uddhav Thackeray’s birthday, on behalf of Shiv Sena,shrimant Dagdusheth Halwai Ganpati was given a 61 kg Modak.
 पुणे, 26/07/2021- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस ६१ किलोचा माव्याचा मोदक अर्पण करून महाआरती करण्यात आली. 

 या प्रसंगी भगवान गणेशांना मागणे - संकल्प करतांना विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे यांनी देवाचे आभार मानले आणि उद्धव ठाकरे यांना दीर्घायुरारोग्य मिळावे, उद्धवजी ठाकरे यांनी हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले आहे परंतु सर्व जग,महाराष्ट्र,पुणे मुंबई अशा सर्वत्र विनाश करणार्‍या महामारी व संकटातून जात आहे त्यातून मुक्तता मिळावी, कोरोना महामारी व आताच्या नैसर्गिक आपत्ती मध्ये मरण पावलेल्यांच्या आत्म्यास शांति मिळावी, या सर्व आपत्तीग्रस्तांचे योग्य पुनर्वसन व्हावे व सेवा करण्याचे बळ उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे आणि सरकारला मिळावे.कोरोना परिस्थितीतून मार्ग मिळावा,अशी प्रार्थना केली.

याप्रसंगी रवींद्र मिर्लेकर,संपर्क प्रमुख बाळाभाई कदम ,शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे,राजेंद्र शिंदे,अशोक हरणावळ,नगरसेविका पल्लवी जावळे,संगीता ठोसर,उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे,सुदर्शना त्रिगुणाईत,अमृत पठारे,प्रभाग समन्वयक नागेश खडके,मकरंद पेटकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: