सफाई कामगारांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार – आमदार प्रशांत परिचारक

पंढरपूर नगरपरिषदच्यावतीने सेवानिवृत्त सफाई कामगाराच्या 14 वारसांना आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वाटप MLA Prashant Paricharak will solve all the problems of the cleaners

पंढरपूर,28/07/2021 – पंढरपूर नगरपरिषदच्यावतीने सेवानिवृत्त,स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व मयत झालेल्या 14 सफाई कामगारांचे वारसांना लाड मलकांनी कमिटीच्या शिफारसीनुसार वारसा हक्काने त्यांचे वारसांना सेवेत घेण्याचे नियुक्ती आदेश आमदार प्रशांत परिचारक यांचे हस्ते नगराध्यक्षा सौ साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे , मुख्याधिकारी अरविंद माळी, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पक्षनेते अनिल अभंगराव,गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक राजू सर्वगोड, उपमुख्याधिकारी व कामगार नेते सुनिल वाळूजकर ,पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापूरे ,कार्याध्यक्ष नाना वाघमारे, सहकार्याध्यक्ष तथा आरोग्यधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, लिपिक श्रीशैल्य चाबुकस्वार, धनजी वाघमारे, किशोर खिलारे,संतोष सर्वगोड, गुरू दोडिया,महावीर कांबळे आदींच्या उपस्थितीत देण्यात आले .

   यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी नगरपरिषद कर्मचार्यांच्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून सफाई कामगारांचे सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावणार आहे असे सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: