श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी येथे फुलांची आकर्षक आरास

Attractive flower arrangement in the entire temple including Shri Vitthal Rukmini’s mother’s tomb and at Shri Sant Namdev Payari

पंढरपूर, 28/07/2021-आज बुधवार दि .२८/ ०७/२०२१ रोजी आषाढ कृ .०५ ,श्रींची प्रक्षाळ पूजेनिमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास तसेच संपुर्ण मंदिरात व श्री संत नामदेव पायरी महाद्वार येथे फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती . त्यामुळे श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्या सह श्री विठ्ठल सभा मंडपास व मंदिरास फुलांच्या सजावटीमुळे मनमोहक स्वरूप प्राप्त झाले होते.

फोटो – सतीश चव्हाण
     आषाढ कृ ०५ ,श्रींच्या प्रक्षाळ पूजेनिमीत्त ही फुलांची आरास भाविक अमोल शेरे आणि अभिजित मोहिते,पुणे यांच्यावतीने  झेंडू ,शेवंती ,गुलछडी ,ऍनथोरीयम ,ऑरकेड , गुलाब,ब्लू ,कामिनी इत्यादी फुलांची रंगसंगती वापरून आरास करण्यात आली होती. साधारणतः २ टन फुले आरासाकरीता वापरण्यात आली होती. श्री लक्ष्मी फ़ॉवर्स आणि डेकोरेटर्स ,पुणे यांनी ही आरास केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: