पे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी -भारतीय राष्ट्रवादी पार्टी
पे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबवावी Stop forcible recovery of pay and parking scheme

पिंपरी चिंचवड ,28/07/2021 - पे अँड पार्किंग योजनेची जबरदस्तीने होणारी वसुली थांबववी कारण पिंपरी चिंचवड शहरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्योग व्यवसाय,व्यापारी वर्ग, रिक्षाचालक यांच्यावर अत्यंत गंभीर परिणाम झाला असून या शहरातील सामान्य करदात्या नागरिकाच्याही हाताला काम नाही,रोजगार नाही, लॉकडाऊनचे गंभीर परिणाम होऊन नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे ढासळले आहे.कोरोना त्याचबरोबर वेगवेगळे साथीचे आजार यामुळे दवाखान्याचा खर्च वाढला आहे,शिक्षणाचा संदर्भात देखील सर्वसामान्य नागरिकांना खर्च परवडणारा नाही,इंधनाचे वाढलेले प्रचंड दर अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्ष व नगरसेवक यांनी सर्वसामान्य नागरिकांनाचा विचार न करता व विश्वासात न घेता 1 जुलैपासून पे अँड पार्किंगची योजना अंमलात आणून सर्वसामान्य नागरिकांना कडून जबरदस्ती वसुली महापालिका व सत्तेतील नगरसेवक यांच्याकडून केली जात आहे याबाबत
आमच्या भारतीय राष्ट्रवादी पार्टीकडून तीव्र निषेध नोंदवत आहोत.
पे अँड पार्किंगच्या नावाखाली जबरदस्तीने सर्व सामान्य पिंपरी चिंचवडकरांचे खिसे कापून जर पैसे वसुली करत असाल तर लवकर थांबवावी अन्यथा भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी व
कार्यकर्ते जेथे जेथे पे अँड पार्किंगची वसुली होत असेल तेथे ती बंद पाडू हे जर झाले तर याला पालिका व आयुक्त जबाबदार असतील यासाठी लवकरात लवकर ही योजना बंद करावी अशी मागणी भारतीय राष्ट्रवादी पक्षाचेवतीने राज्याचे संपर्क प्रमुख अजित प्रकाश संचेती यांनी केली आहे .