ऑक्सिजन मॅन युवा नेते अभिजीत आबा पाटील वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

ऑक्सिजन मॅन युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन Organizing various social activities on the occasion of the birthday of oxygen man young leader Abhijeet Aba Patil
अनावश्यक खर्च टाळून पूरग्रस्त भागातील नागरिकांना करणार मदत

पंढरपूर / नागेश आदापूरे :- धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन अभिजित धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, अन्नदान, गरजू लोकांना किराणा कीट वाटप, वृक्षारोपण, कोवीड योद्धांचा सन्मान असे अनेकांनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अनावश्यक खर्च टाळून मागील काही दिवसांत अतिवृष्टी झालेल्या सांगली, कोल्हापूर, कराड अशा पूरग्रस्त भागात नागरिकांसाठी जीवनावश्यक मदत वाढदिवसानिमित्त पाठविण्यात येणार आहे.

भव्य रक्तदान व भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन

पंढरपूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेले युवा नेते म्हणून चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वावर परजिल्ह्यात जाऊन यशस्वी साखर कारखाने चालवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.या कोविडच्या काळात ऑक्सिजनचा तुटवड्यावर देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करणारे “ऑक्सिजन मॅन” म्हणून पाटील यांची ओळख आख्या महाराष्ट्रात झाली आहे. पंढरपूरमध्ये स्वतःच्या मल्टिप्लेक्समध्ये चक्क कोविड सेंटर उभा करून तालुक्यातील नागरिकांना त्यांनी कोरोनाच्या प्रकोपात मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे प्रत्येक कार्यात अग्रेसर असणारे अभिजीत पाटील यांनी पंढरपूरच्या राजकारणात आपली वेगळी ओळख व स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असताना पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो युवकांना स्वयंरोजगाराची, लघुउद्योगाची वाट दाखवली आहे.शहर आणि तालुक्यातील तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करून अर्थकारणाच्या वाटेवर यशस्वी होण्यास प्रोत्साहित केले आहे.त्यामुळेच पंढरपूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात देखिल अभिजीत पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. विकासाच्या वाटेवरील राजकारणच सवर्सामान्य जनतेच्या तरुणांच्या जीवनात बदल घडवून आणू शकते ही संकल्पना घेऊन तरूणाईला दिशा दाखवणारे आहे अशी भूमिका मांडत ते शहर व तालुक्यात प्रचंड लोकप्रिय नेतृत्व म्हणून उदयास आले आहेत.

धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील
 १ऑगस्ट रोजी अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस असताना शहर व तालुक्यातील विविध ठिकाणी अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करून अभिजीत पाटील यांनी दाखविलेल्या जनसेवेतून लोकहितासाठी वाटचाल करून उपक्रम करीत असल्याचे धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: