पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटपसह विविध कार्यक्रम राबवून अर्जुन चव्हाण यांचा वाढदिवस साजरा

पूरग्रस्तांना ब्लँकेट वाटपसह विविध कार्यक्रम राबवून अर्जुन चव्हाण यांचा वाढदिवस साजरा Celebrate Arjun Chavans birthday by distributing blankets to flood victims
 पंढरपूर /प्रतिनिधी:- अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 रत्नागिरी,चिपळूण, रायगड,सांगली आदी भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांना स्थलांतर करावे लागले,अनेक कुटुंबे रस्त्यावर आली अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून 150 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तसेच कोविडच्या रूग्णांना मदत व्हावी या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आदि सामाजिक विविध कार्यक्रम मराठा महासंघाच्यावतीने तसेच अर्जुनराव चव्हाण मित्र परिवाराच्यावतीने घेण्यात आले. 

      येथील तांबट धर्मशाळा येथे दि.एक ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आलेले ब्लॅंकेट आज पंढरपूरचे उपविभागीय प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे इंदापूर बावडा येथील बागायतदार व उद्योजक काशिनाथ अनपट तसेच सोलापूरचे पोलीस सहाय्यक निरीक्षक विनायक काळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. 

   मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण,काशिनाथ अनपट, विनायक काळे, महासंघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल पवार, शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे, तालुकाध्यक्ष संतोष जाधव तालुका कार्याध्यक्ष शिवाजी मोरे, शहर संघटक काका यादव, सचिन थिटे,रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नागेश गायकवाड आदींच्या उपस्थितीत ब्लॅंकेट देण्यात आले.

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: