व्यापक आंदोलना शिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत – डॉ आशिषकुमार सुना
व्यापक आंदोलनाशिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत – डॉ आशिषकुमार सुना
पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूरात बैठक
पंढरपूर / प्रतिनिधी - पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष रामचंद्र सरवदे होते.
या बैठकीत - प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा,
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना
पत्रकारांसाठी विमा व घरकुल योजना
यादीवर नसलेल्या वृतपत्र ना शासकीय जाहिराती मिळणे
कोरोनामुळे निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसांना शासकीय मदत
राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी
पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी
राज्यातील युट्युब ला शासकीय मान्यता व जाहिराती मिळणे यासह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
व्यापक आंदोलनाशिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत – डॉ आशिष कुमार सुना
गेली अनेक वर्षापासून राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने वारंवार आंदोलन, उपोषण, निवेदन सुरु असून राज्य सरकारला जाग आणण्यासाठी व पत्रकारांचे प्रश्न सुटण्यासाठी व्यापक आंदोलन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना यांनी केले आहे .
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार ,अक्षय बबलाद ,बाबा काशीद ,रमेश अपराध शेवडे, चैतन्य उत्पात आदी उपस्थित होते.