पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ठ प्राचार्य पुरस्कार प्राचार्य डॉ.आर.आर.पाटील यांना जाहीर

पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ठ प्राचार्य पुरस्कार प्राचार्य डॉ.आर.आर.पाटील यांना जाहीर Outstanding Principal Award announced to Principal Dr.R.R.Patil
   कुर्डुवाडी / राहुल धोका - दिनांक ३० जुलै २०२१ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर या विद्यापीठाने सन २०२०-२०२१ चा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार के. एन. भिसे आर्टस, कॉमर्स अँण्ड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, विद्यानगर भोसरे ,ता. माढा जि. सोलापूर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.पाटील यांना जाहीर केला आहे. 

माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ,कुर्डूवाडी या संस्थेचे अध्यक्ष मा.आ.विनायकराव पाटील, संस्थेचे सचिव बाळासाहेब भिसे आणि सर्व सदस्य तसेच प्राचार्य राजमाने एन.आर., प्रा.शहा पी.के., डॉ.राजेंद्र दास तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन केले. पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचा १७ वा वर्धापन दिन समारंभ दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न होणार आहे. 

या समारंभात प्राचार्य डॉ.आर.आर.पाटील यांना सन २०२१ चा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सदर समारंभास कर्नल डॉ. जी.तिरुवसगम, अध्यक्ष भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून प्र.कुलगुरु डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ.विकास घुटे, उपकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.

प्राचार्य डॉ.आर.आर.पाटील यांनी त्यांच्या प्राचार्य पदाच्या कारकिर्दीमध्ये शैक्षणिक व प्रशासकीय केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे. त्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जात आहे.प्राचार्य डॉ.आर. आर. पाटील यांनी ग्रामीण भागातील के.एन.भिसे आर्टस् कॉमर्स अँण्ड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, विद्यानगर भोसरे या महाविद्यालयाचा कायापालट करुन गुणवत्तेच्या उंच शिखरावर हे महाविद्यालय नेऊन ठेवलेले आहे.महाविद्यालयातील भौतिक सुविधां मध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, इन-डोअर स्पोर्टस हॉल, ऑडिटोरियम, प्राचार्य कार्यालय, ग्रीन कॅम्पस, इत्यादी भव्य इमारती बांधून सुसज्ज असे महाविद्यालय उभे केले आहे.

    महाविद्यालयाच्या भौतिक सुविधांबरोबर शैक्षणिक सुविधा निर्माण करून महाविद्यालयाचा गुणत्मक व संख्यात्मक विकास कैलेला आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लागणा या सर्व प्रकारच्या सुविधां निर्माण करुन महाविद्यालय एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहे. महाविद्यालयाचे बंगलुरु येथील नॅक कार्यालयाकडून दोन वेळा मुल्यांकन व पुर्नमुल्यांकन करुन घेतलेले आहे तसेच महाविद्यालयात प्रत्येक वर्षी नॅशनल व इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेऊन विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात. प्राचार्य डॉ.आर.आर. पाटील यांच्या मागदर्शनाखाली एकूण ११ विद्यार्थ्यांची पीएच.डी. डिग्री अँवार्ड झाली असून त्यांना नॅशनल ,इंटर नॅशनल व स्टेट लेवलची एकूण २३ अँवॉर्ड मिळालेली आहेत. महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागातून सुमारे ५००० विद्यार्थ्यांना वेगवेळ्या क्षेत्रात सर्व्हिस मिळाली असून महाविद्यालयाच्या वरीष्ठ व कनिष्ठ विभागात विज्ञान शाखा सुरु करुन अनुदानित केलेल्या आहेत. एकंदरीत त्यांच्या प्राचार्यपदाच्या काळात म्हणजेच सन २००४ ते सन २०२१ या काळात महाविद्यालयाच्या विकास झाला.गतवर्षी महाविद्यालयास सन २०२० मधील पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार ही मिळालेला आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची टिम तयार करुन महाविद्यालयाच्या विकासात मोलाची भर टाकली आहे. प्राचार्य पदाची धुरा सांभाळत असतानांच अभ्यासक्रमाची पुस्तके व रिसर्च पेपर प्रकाशीत केलेले आहेत. वरील सर्व उपक्रम महाविद्यालयात राबवितांना  मृणालिनी फडणवीस मॅडम कुलगुरु, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूर, प्र.कुलगुरु डॉ. देवेंद्र मिश्रा, कुलसचिव डॉ.विकास घुटे, उपकुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे यांचे महाविद्यालयाच्या विकास कामात मोलाचे सहकार्य लाभले आहे.

-प्रा.प्रमोद शहा, माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: