राजकीय कुरुक्षेत्री एक दीपस्तंभ तू
जेष्ठ नेते दिवंगत माजी मंत्री,आमदार ,
श्री.गणपतराव देशमुख उर्फ आबा यांचे संदर्भात….
राजकीय कुरुक्षेत्री एक दीपस्तंभ तू
नीती सत्य सत्व तत्व
सेवा चारित्र्य अन
प्रामाणिकतेचा एक दीपस्तंभ तू
विधिमंडळा जागृत कर्तव्यदक्ष
अनुभवी अभ्यासू अन
नाही रे गटाचा आधारस्तंभ तू
अकरा वेळा विधिमंडळा
निवडणूक जिंकणारा कर्मयोगी तू
उपसून आड परिश्रमाचे
केले नंदनवन अन फुलवले माळराना
ऋषीतुल्य शिल्पकार तू
सूर्य चंद्र नांदो गातील गीत तुझ्या
कर्तृत्वाचे चारोदिशा
एक विभूती कर्मवीर तू “!!

नीतीचे चारित्र्याचे कर्तृत्वाचे
माणुसकीचे साधेपणाचे पारदर्शकतेचे
मृदुतेचे आपुलकीचे न्यायाचे अन
सत्याचे पर्व आज लोपले!
वयाच्या ९४ व्या वर्षी लोकनेते ११वेळा आमदार असलेले श्री.गणपतराव देशमुख उर्फ आबा यांचे दुःखद निधन ! भावपूर्ण श्रद्धांजली !!
आनंद कोठडीया, कृषीरत्न,
लोक विकास व कृषी परिवार, महाराष्ट्र
९४०४६९२२००
