लायन्स क्लब आँफ सोलापूर ट्विन सिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न

लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न The inauguration ceremony of Lions Club of Solapur Twin City was held with enthusiasm
 सोलापूर - लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटी चा 2021-2022चा पदग्रहण सोहळा हॉटेल ग्रीनवुड रिसॉर्ट येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला पदग्रहण अधिकारी म्हणून बार्शीचे माजी प्रांतपाल लायन MJF जितेंद्र दोशी यांनी नूतन अध्यक्ष सौ. नंदिनी जाधव, सचिव सागर पुकाळे व खजिनदार सुनंदा शेंडगे यांना शपथ प्रदान केली. तरी या कार्यक्रमात वैभव जाधव , यशोमती जाधव, आनिरुध्द होमकर,श्वेतांबरी मालप,विश्वनाथ स्वामी,नागेश परसगोंड, नागेश चपळगी,राजकुमार रंगम या सदस्यांनी लायन्स क्लब आॕफ सोलापूर ट्विन सिटी चे सभासदत्व स्वीकारले. या नवीन सदस्यांना शपथ देण्यासाठी इंडक्शन ऑफिसर म्हणून द्वितीय उपप्रांतपाल फलटणचे भोजराज नाईक निंबाळकर यांनी त्यांना शपथ प्रदान केली आणि लायनिझमचे महत्व सांगून त्यांना मार्गदर्शन केले. माजी प्रांतपाल जितेंद्र दोशी यांनी क्लब च्या प्रत्येक मेंबरच्या पदाचे महत्त्व सांगून त्यांना त्याची जबाबदारी सांगितले . माजी प्रांतपाल डॉ वेंकटेश यजुर्वेदी यांनी सर्व मेंबरना मार्गदर्शन केले . मागील अध्यक्ष डॉ राहुल चंडक यांनी नूतन अध्यक्ष सौ नंदिनी जाधव, सचिव सागर पुकाळे, खजिनदार सुनंदा शेंडगे यांना अधिकृत पदभार दिला.

या कार्यक्रमामध्ये मागील वर्षाचा रिजन आवार्ड देण्यात आले . या अवार्ड मध्ये रायझिंग स्टार म्हणून अभियंता सागर पुकाळे यांना , बेस्ट प्रेसीडेंट म्हणून डॉ.राहुल चंडक यांना , बेस्ट सेक्रेटरी म्हणून नागेश बुगडे यांना आणि बेस्ट क्लब म्हणून लायन्स क्लब सोलापूर ट्विन सिटी ला आवार्ड देण्यात आले.

 या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लायन MJF ममता बुगडे व लायन डॉ. कृष्णा चंडक यांनी केले. आभार प्रदर्शन सागर पुकाळे यांनी केले .यावेळी विभागीय सभापती अझम भाई शेख ,माजी प्रांतपाल अशोक मेहता , शिल्पा दोशी, अरविंद कोणसलगीरीकस ,सिध्देश्वर बँक मँनेजमेंट बोर्डाचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे ,माजी रिजन चेअरमन अभिजीत जोशी,उपविभागीय सभापती महेश नळे महाराष्ट्र लायन M K पाटील, लायन्स क्लब आय हॉस्पिटलचे रमेश जैन,अण्णासाहेब कोतली, माणिक गोयल , महबुब शेख ,सोलापूर मेन चे अध्यक्ष गोविंद मंत्री,सेंट्रलचे अध्यक्ष चौगुले,राजीव देसाई , ममता बुगडे, नागेश बुगडे , मुकुंद जाधव,  हिराचंद धुळम ,ज्ञानेश्वर कुलकर्णी ,कविता पुजारी, औदप्पा पुजारी,अनिता कोडमुर यांच्यासह अनेक मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: