डॉ. आशुतोष रारावीकर, शिवाजी शिंदे आणि विवेक बापट यांना ‘पुष्पाई’ काव्य पुरस्कार जाहीर Dr. Ashutosh Raravikar,Shivaji Shinde and Vivek Bapat announced ‘Pushpai’ kavya Award
पंढरपूर /प्रतिनिधी :- येथील कवी रवि वसंत सोनार यांच्या मातोश्री स्व.सौ.पुष्पावती वसंत सोनार यांच्या स्मरणार्थ पंढरपूर वृत्तपत्र लेखक संघाच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून मराठी भाषेतील उत्कृष्ट काव्यसंग्रहास देण्यात येणारा 'पुष्पाई काव्य पुरस्कार' जाहीर झाला असून २०१९ वर्षातील काव्यसंग्रहासाठी 'पुष्पाई काव्य पुरस्कार' साठी नाशिक येथील कवी विवेक बापट यांच्या 'एक पान तुमच्यासाठी' या काव्य संग्रहाची तर २०२० या वर्षातील काव्यसंग्रहासाठी 'पुष्पाई काव्य पुरस्कार' साठी सोलापूर येथील कवी शिवाजी शिंदे यांच्या 'कैवार ' या काव्य संग्रहाची आणि मुंबई येथील सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व कवी डॉ. आशुतोष रारावीकर यांच्या 'यशपुष्प' या दोन काव्य संग्रहाची निवड करण्यात आली आहे. सर्व पुरस्कारार्थींना पुष्पगुच्छ, महावस्त्र, सन्मान चिन्ह, ग्रंथ व सन्मान पत्र सुपूर्द करून गौरविण्यात येणार आहे.
Like this:
Like Loading...