विदयार्थी केंद्र बिंदू मानून प्रामाणिकपणे काम केल्यास आत्मीक समाधान मिळते- ज्ञानेश्वर बनसोडे

विदयार्थी केंद्र बिंदू मानून प्रामाणिकपणे काम केल्यास आत्मीक समाधान मिळते- ज्ञानेश्वर बनसोडे If you work honestly with the student as the focal point, you will get spiritual satisfaction – Dnyaneshwar Bansode
    राहता - शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून सेवा करायची असेल विदयार्थी हा चिखलाचा गोळा असतो, त्यास आकार देऊन आकर्षक बनवायचा असेल तर विदयार्थी केंद्र बिंदू मानून प्रामाणिक पणे काम करा,त्यांना असे शिक्षण दया ,की जेणे करून हे विद्यार्थी देशाचे भावी आधारस्तंभ ठरतील,अशी निस्वार्थी सेवा या चिमुकल्याची केल्यास ,निश्चितच आत्मीक समाधान मिळाल्या शिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर बनसोडे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिर ,राहाता विद्यालयात ते त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात बोलत होते.

 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे चेअरमन रमेश शिंदे होते प्रमुख पाहुणे म्हणून कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिक सौ विद्या ब्राम्हणे होत्या. सौ सुशीला बनसोडे व ज्ञानेश्वर बनसोडे या उभयतांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. 

   प्रास्ताविक अशोक कडनोर यांनी केले.गमे बी.आर.,विवेक गाडेकर,प्रमोद तोरणे ,भीम शक्तीचे नेते भाऊसाहेब साठे, पूजा जाधव,साक्षी बनसोडे यांनी बनसोडे यांचेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.शारदा संकुलातील मुले विभाग, कन्या विभाग ,तांत्रिक विभाग व इडू टॉप यांच्या वतीने बनसोडे यांचा सपत्नीक  सत्कार केला. 

बनसोडे पुढे आपल्या भाषणात म्हणाले की,मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना माझी अर्धांगिनी सौ.सुशीला हिची देखील साथ मला लाभली आहे, जीवनात मी जी काही प्रगती केली आहे, त्याचे सर्व श्रेय मी माझ्या पत्नीला देतो. 

यावेळी व्यासपीठावर भीमशक्तीचे सरचिटणीस भाऊसाहेब साठे,भारत सावंत, नारायण नाईक, बाबासाहेब नाईकवाडी,दिलीप वाघमारे, कोंडी राम साठे आदी उपस्थित होते.मुख्याध्यापक पिलगर एम के यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद गमे,रमेश आहेर, विजय जेजुरकर,पर्वत उर्हे व आदींनी प्रयत्न केले.सूत्रसंचलन एस पी बंगाळे व साळवे मँडम यांनी केले.आभार दत्ता पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: