विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा नेते अभिजीत पाटील यांचा वाढदिवस साजरा

विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस साजरा Celebrate birthday of young leader Abhijeet Aba Patil by implementing various social activities

पंढरपूर /नागेश आदापूरे, ०२/०८/२०२१ – पंढरपूर तालुक्याचे नेते आणि धाराशिव साखर कारखाना युनिट१,२,३ चे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, भव्य आरोग्य तपासणी शिबीर, अन्नदान, गरजू लोकांना किराणा किट वाटप, वृक्षारोपण, कोवीड योद्धाचा सन्मान अशा उपक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.

अनावश्यक खर्च टाळून मागील काही दिवसांत अतिवृष्टी झालेल्या सांगली, कोल्हापूर, कराड अशा पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक मदत वाढदिवसानिमित्त पाठविण्यात आली. 

502 जणांनी केले रक्तदान तर अनेक ठिकाणी वृक्षारोपण व महाआरोग्य,नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

   पंढरपूर तालुक्यातील सध्या चर्चेत असलेले युवा नेते चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वावर परजिल्ह्यात जाऊन यशस्वी तीन साखर कारखाने चालवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात आहे. काल १ ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढ दिवसानिमित्त पिराची कुरोली,नांदोरे,देगाव, पंढरपूर आदी गावात तसेच धाराशिव कारखाना युनिट१,२,३ मध्ये 502 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच पळशी,पटवर्धन कुरोली,शेळवे,देगाव,शेळवे, अनवली,फुलचिंचोली या गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षरोपण करण्यात आले. महाआरोग्य तपासणी शिबीर रायगड लाॅन्स, भोसे येथे आयोजीत करण्यात आले होते . 

  कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन तुटवड्या वर मात करण्यासाठी देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा करणारे "ऑक्सिजन मॅन" म्हणून पाटील यांची ओळख अख्या महाराष्ट्रात झाली आहे. पंढरपूरमध्ये स्वतःच्या मल्टिप्लेक्स मध्ये कोविड सेंटर उभा करून तालुक्यातील रुग्णांना त्यांनी कोरोनाच्या प्रकोपात मोठा दिलासा दिला होता. त्यामुळे प्रत्येक कार्यात अग्रेसर असणारे अभिजीत पाटील यांनी पंढरपूरच्या राजकारणात आपली वेगळी ओळख व स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत असताना पंढरपूर शहर व तालुक्यातील हजारो  युवकांना स्वयंरोजगाराची, लघुउद्योगाची वाट दाखवली आहे. शहर तालुक्यातील तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करून अर्थकारणाच्या वाटेवर यशस्वी होण्यास प्रोत्साहित केले आहे.त्यामुळेच पंढरपूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात देखील अभिजीत पाटील यांचा मोठा प्रभाव आहे.ह्या त्यांच्यावरील प्रेमापोटी पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोपाळपूर येथील वृद्धाश्रमात अन्नदान तर देवडे येथे धान्यवाटप करण्यात आले होते. 

 १ ऑगस्ट रोजी अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस असताना पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध ठिकाणाहून नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: