इंदापूर येथे आयडीएफसीच्या वतीने खातेदारांना किराणा किट वाटप

इंदापूर येथे आयडीएफसीच्यावतीने खातेदारांना किराणा किट वाटप Distribution of grocery kits to account holders on behalf of IDFC at Indapur

इंदापूर, ०२/०८/२०२१- इंदापूर जिल्हा पुणे येथे आयडीएफसी फर्स्ट भारत लिमिटेड कडून प्रत्येक वेळी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. समाजाचे काहीतरी देणे आहे या भावनेतून समाजातील दुर्बल घटकांसाठी वेळोवेळी मदत करत येत असते. अन्नदान,आरोग्य शिबिर, पशु वैद्यकीय शिबीर,महिला सक्षमीकरण , वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम,वृक्षरोपण,शाळे तील गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृती तसेच शाळा व महाविद्यालये यांना स्मार्ट बोर्ड वाटप असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. कोरोनामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत.हाताला काम नसल्यामुळे आणि जवळ पैसा नसल्यामुळे अनेक कुटुंबाची उपासमार होत आहे. याची गरज ओळखून आयडीएफसी फर्स्ट भारत लिमिटेड कडून महाराष्ट्रातील प्रत्येक शाखेमार्फत खातेधारकांच्या कुटुंबियांना किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये आपला ग्राहक सुरक्षित राहावा व समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी या भावनेतून आज आयडीएफसी शाखा इंदापूरच्या वतीने खातेदारांना इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन मुटेकर यांच्या हस्ते किराणा किट वाटप करण्यात आले.

    यावेळी आयडीएफसी इंदापूर चे शाखा व्यवस्थापक तुषार बरकले आणि शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते . हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टनसिंग पाळून पार पडला. 

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: